VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:02 IST2025-09-24T16:02:19+5:302025-09-24T16:02:44+5:30
फोटोसेशन सुरू असताना अचानक एक माकड जोडप्यापैकी एका व्यक्तीच्या खांद्यावर येऊन बसले आणि त्यानंतर त्याने जे काही केले, ते पाहून नेटकरी अक्षरशः पोट धरून हसत आहेत.

VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
जयपूरमधील गलताजी मंदिरात फिरण्यासाठी आलेल्या एका विदेशी जोडप्यासोबत असा काहीतरी मजेशीर प्रकार घडला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोसेशन सुरू असताना अचानक एक माकड जोडप्यापैकी एका व्यक्तीच्या खांद्यावर येऊन बसले आणि त्यानंतर त्याने जे काही केले, ते पाहून नेटकरी अक्षरशः पोट धरून हसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती विदेशी जोडप्याचे फोटो काढत आहे. शांत आणि रोमँटिक अशा वातावरणात फोटोसेशन सुरू असताना, अचानक एक माकड मागून येऊन त्या विदेशी व्यक्तीच्या खांद्यावर चढले. या अनपेक्षित पाहुण्यामुळे जोडप्याचे फोटोसेशन एका अविस्मरणीय आणि विनोदी क्षणामध्ये बदलले. इंटरनेटवरील लोकांनाही यातून मनोरंजनाचा एक चांगला डोस मिळाला आहे. हा व्हिडीओ बघून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
माकडाने चोरली लाईमलाईट!
व्हिडीओमध्ये दिसते की, माकड सुरुवातीला आरामात विदेशी व्यक्तीच्या खांद्यावर बसून असते. पण खरा मजा तेव्हा येतो, जेव्हा ते कॅमेऱ्याकडे पाहते आणि अशा काही पोज देऊ लागते, की प्रत्येक फोटोमध्ये तेच स्टार बनून जाते. माकडाचा हा अचानक कॅमियो त्या जोडप्याच्या रोमँटिक क्षणाला एका अविस्मरणीय क्षण बनवले आहे.
व्हिडीओमध्ये माकड कॅमेऱ्यासमोर विविध हावभाव करताना दिसते, तर जोडप्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू स्पष्टपणे दिसते. हा क्षण त्यांच्यासाठी अधिकच अविस्मरणीय बनला आहे. हे माकड तर खूप फोटोजेनिक दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'jaipur_ka_tukda' या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, आणि बघता बघता तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे.
एका युजरने कमेंट केली, "जोपर्यंत माकड फोन हिसकावून घेत नाही, तोपर्यंत हे मजेशीर आहे." तर काही युजर्सनी माकडाच्या या गोंडसपणाचे कौतुक केले असून त्याला 'सर्वात गोड फोटोबॉम्बर' असे म्हटले आहे.