VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:11 IST2025-12-04T15:09:44+5:302025-12-04T15:11:36+5:30
१२वीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलाने आपल्या गर्लफ्रेंडच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी असं काही केलं की..

AI Generated Image
सुरक्षा आणि शांततेसाठी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे जर तुमच्याच प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरले तर? असाच एक धक्कादायक आणि तितकाच आश्चर्यकारक प्रकार सध्या आसाममधून समोर आला आहे. येथे १२वीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलाने आपल्या गर्लफ्रेंडच्या घरातील संपूर्ण सीसीटीव्ही सिस्टमच आपल्या फोनवरून हॅक केली.
केवळ कॅमेरा हॅकच केला नाही, तर हा मुलगा अनेक दिवसांपासून त्या कॅमेऱ्याच्या लाइव्ह फुटेजवर पूर्ण नियंत्रण ठेवून होता.
नेमके प्रकरण काय?
हे प्रकरण आसाममधील श्रीभूमी भागातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही विद्यार्थिनी तिच्या कुटुंबासोबत एका फ्लॅटमध्ये राहते. एका दिवशी शेजाऱ्यांनी पाहिले की एक अल्पवयीन मुलगा वारंवार बिल्डिंगच्या आसपास घुटमळत आहे. सुरुवातीला त्यांना तो अनोळखी व्यक्ती काहीतरी चुकीच्या हेतूने फिरत असल्याचा संशय आला.
शेवटी शेजाऱ्यांनी त्याला हटकले आणि जेव्हा त्याच्या मोबाईलची तपासणी केली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्या मुलाच्या फोनवर मुलीच्या फ्लॅटच्या आतील लाइव्ह फुटेज सुरू होते. याचा अर्थ, तो केवळ कॅमेऱ्याची फुटेज बघत नव्हता, तर अनेक दिवसांपासून त्या कॅमेऱ्याच्या देखरेखीवर पूर्ण नियंत्रण ठेवून होता.
हॅकिंगचा 'हा' सोपा मार्ग!
हा प्रकार उघडकीस येताच स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अल्पवयीन असल्याने त्याच्यावर ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत कारवाई केली जात आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. एका शाळकरी मुलाने हे कसे केले, असा प्रश्न अनेकांना पडला.