Video: महिलेचा निष्काळजीपणा भोवला; चिमुकला लिफ्टमध्ये अडकला, पाहा पुढे काय झाले..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:39 IST2025-10-09T14:39:02+5:302025-10-09T14:39:18+5:30
Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: महिलेचा निष्काळजीपणा भोवला; चिमुकला लिफ्टमध्ये अडकला, पाहा पुढे काय झाले..?
पालकांच्या निष्काळजीपणाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पालकांचा निष्काळजीपणा अनेकदा त्यांच्या लहान मुलांच्या जीवावर बेतल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या निष्काळजीपणामुळे लहान मूल लिफ्टमध्ये अडकल्याचे दिसते. एका छोट्याशा चुकीचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो, हे यातून दिसून येते.
ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. ही घटना नेमकी कुठे घडली आहे याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही, मात्र व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, एक महिला आपल्या छोट्या मुलासोबत लिफ्टमध्ये प्रवेश करते. काही सेकंदानंतर महिला सामान आणण्यासाठी लिफ्टबाहेर जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होऊ नये म्हणून, गेटजवळ वस्तू ठेवते. पण दुर्दैवाने, ती वस्तू सरकते आणि लिफ्टचा दरवाजा अचानक बंद होतो.
एक महिला के छोटी सी गलती से बच्चा लिफ्ट में फस गया फिर देखिए क्या होता है? pic.twitter.com/A2yAvOFoFI
— Dilip kumar (@dilipku8651) October 8, 2025
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दृश्य अत्यंत भीषण आणि भीतीदायक दिसते. मात्र, हा व्हिडिओ अर्धवट असल्यामुळे, त्या मुलासोबत पुढे काय घडले, तो सुरक्षित बाहेर ला का, याबाबत कुठलीही माहिती नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी निष्काळजीपणासाठी त्या महिलेला जबाबदारी धरले. या घटनेतून पालकांनी सावध राहण्याचा सल्लाही अनेकांनी दिला.