महिलेने बनवला फक्त एक पॉपकॉर्न, व्हिडीओला मिळाले ८ कोटी व्ह्यूज; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:58 IST2024-09-25T15:57:15+5:302024-09-25T15:58:56+5:30
Viral Video : सध्या एक व्हायरल झालेला व्हिडीओ सामान्य असूनही त्याला इतके व्ह्यूज मिळाले की, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

महिलेने बनवला फक्त एक पॉपकॉर्न, व्हिडीओला मिळाले ८ कोटी व्ह्यूज; कारण...
Viral Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ गमतीदार, कधी धडकी भरवणारे तर कधी अवाक् करणारे असतात. लोक हे व्हिडीओ शेवटपर्यंत बघतात. ज्यामुळे व्हिडिओंना व्ह्यूजही वाढतात. पण सध्या एक व्हायरल झालेला व्हिडीओ सामान्य असूनही त्याला इतके व्ह्यूज मिळाले की, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हिडीओ एक महिला ताव्यावर पॉपकॉर्न बनवताना दाखवण्यात आली आहे. पण ती केवळ एकच पॉपकॉर्न बनवत आहे. यासाठी ती ताव्यावर एक थेंब तेल टाके आणि थोडं मीठ टाकते. एका लाकडी चमच्या ती ते मिक्स करते. एका छिद्र असलेला चमचा घेते आणि त्यात कॉर्न ठेवते. यात पुढे काय होतं हे बघण्याची उत्सुकता वाढते. काही वेळाने कॉर्न फुटून पॉपकॉर्न तयार होतं. तसा तर व्हिडीओ फारच सामान्य आहे. मात्र, लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा आहे. लोक पुढे काय होणार विचार करत पूर्ण व्हिडीओ बघतात.
हेच कारण आहे की, या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ८.७ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'मला राग येत आहे. कारण मी त्या छोट्याशा पॉपची वाट बघत होतो'. जास्तीत यूजर्स अशाप्रकारे चिडले आहेत. दुसऱ्याने लिहिलं की, 'सगळ्यात जास्त दयनीय हे आहे की, मी पूर्ण व्हिडीओ बघितला'.