Video: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; तिला पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 13:15 IST2021-07-12T13:13:16+5:302021-07-12T13:15:02+5:30
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; तिला पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. लस घेताना ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते, त्यांचे व्हिडिओही समोर येत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात दिसतं की एक महिला लस घेतना इतकं जोरात ओरडते की तिचा आवाज ऐकूनच आसपासचे लोकही घाबरतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला लस घेण्यासाठी एका खुर्चीवर बसलेलीआहे. नर्स इंजेक्शन हातात घेऊन जवळ येताच ही महिला घाबरते. या व्हिडिओमध्ये महिला लसीकरण केंद्रात बसलेली आहे. नर्स इंजेक्शन हातात घेऊन लस देण्यासाठी येताच या महिलेच्या चेहऱ्यावरील रंगच उडतो आणि ती रडू लागते. इंजेक्शन देताच महिला मोठमोठ्या ओरडू आणि रडू लागते. तिची ही अवस्था पाहून लस घेण्यासाठी आलेले इतर लोकही घाबरतात आणि तिच्याकडे पाहू लागतात.
हा व्हिडिओ ट्युब इंडियन नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर लोक केवळ हा व्हिडिओ शेअर करत नाहीयेत तर यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे आणि ही महिला कोण आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.