VIDEO: तोल गेल्याने पत्नी छतावरुन खाली पडली; तिला वाचवण्यासाठी पतीनेही मारली उडी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:59 IST2024-02-11T16:58:01+5:302024-02-11T16:59:05+5:30
सोशल मीडियावर या पती-पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

VIDEO: तोल गेल्याने पत्नी छतावरुन खाली पडली; तिला वाचवण्यासाठी पतीनेही मारली उडी...
Social Viral: पती-पत्नीचे नाते जगातील सर्वात अनोखे आणि खास नाते आहे. यात फक्त प्रेमच नाही, तर वादही होतात, पण काही वेळातच त्या वादाचे रुपांतरही प्रेमात होते. या नात्याचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा एकाला वेदना होतात, तेव्हा दुसऱ्यालाही त्रास होतो. सध्या पती-पत्नीशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले असून, नवऱ्याचे खूप कौतुकही करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला तोल गेल्याने छतावरुन खाली पडल्याचे दिसत आहे. यावेळी त्या महिलेची पाठ एका भींतीवर आदळते. यानंतर एका क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेचा पती छतावरुन उडी मारतो आणि पत्नीजवळ जाऊन तिला मदत करतो.
व्हिडिओ पहा:-
A woman fell from her roof and her husband didn’t think twice before jumping to help her ❤️ pic.twitter.com/Zm9K2onoQJ
— non aesthetic things (@PicturesFoIder) February 10, 2024
हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनाला भिडलाय. ट्विटरवर @PicturesFoIder अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 31 मिलियन किंवा 3.1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये नेटकरी त्या व्यक्तीचे खुप कौतुक करत आहेत.