Video : नादच खुळा! केस कापण्याची 'अशी' स्टाईल पाहून म्हणाल, 'हा असला कसला न्हावी'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 19:09 IST2020-09-03T19:00:40+5:302020-09-03T19:09:15+5:30
सध्या सोशल मीडियावर एका केस कापून घेत असलेल्या माणसाचा आणि न्हाव्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Video : नादच खुळा! केस कापण्याची 'अशी' स्टाईल पाहून म्हणाल, 'हा असला कसला न्हावी'...
प्रत्येकालाच आपले केस खुप हवेहवेसे वाटत असतात. सध्याच्या काळात कपड्यांपेक्षाही हेअरस्टाईलकडे जास्त लक्ष दिलं जातं. मुलींपेक्षाही जास्त प्रकारचे हेअरस्टाईल सध्या मुलं करताना दिसून येतात. आपल्या हवीतशी हेअरस्टाईल करण्यासाठी कितीही पैसे मोजण्याची तयारी लोकांची असते. सध्या सोशल मीडियावर एका केस कापून घेत असलेल्या माणसाचा आणि न्हाव्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
We need more barbers like this guy😂 pic.twitter.com/he4dhLMwlu
— 🇧🇧 (@rahm3sh) September 2, 2020
अनेकाजण हा व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसले आहेत. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता न्हावी मस्त स्टाईलमध्ये एका तरूणाचे केस कापत आहे. केस कापत असताना या न्हाव्याची कृती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आपणं केलेली हेअरस्टाईल कशी दिसत आहे हे पाहण्यासाठी हा न्हावी लांबचलांब जाऊन पाहत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी पीपीई किट घालून केस कापणारे लोक तुम्ही पाहिले असतील. पण असा प्रकार पाहून तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल.
@rahm3sh या ट्वीटर युजरनं हा व्हिडीओ २ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला होता. आपल्याला या माणसासारख्या बार्बरची गरज असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २० लाखापेक्षा जास्त व्हिव्हिज मिळाले आहेत. २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स तर ५७.५ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. केस कापण्याची ही स्टाईल पाहून सगळेचजण अवाक् झाले आहेत.
हे पण वाचा-
याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती!
वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली
लय भारी! ड्रग पेडलर्सच्या मुसक्या आवळून पोलिसांनी अखेर सांगितलं,.... रसोडे मे कौन था?