Viral Instagram Reels: लग्नसमारंभात मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. मात्र, सध्या एक असा व्हिडीओ व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही चक्रावून जाल. हा व्हिडिओ एका चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसाचा असून, त्याला मिळालेल्या गिफ्टची लिस्ट ऐकून नेटकरी अक्षरशः अवाक झाले आहेत.
गिफ्टची थक्क करणारी यादी
इन्स्टाग्रामवर akhilesh_chauhan या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाळाच्या मामाने दिलेल्या गिफ्टची यादी वाचना दिसतोय. विशेष म्हणजे, या यादीत केवळ बाळासाठीच नव्हे, तर त्याची आई, आजी, काकी आणि इतर कुटुंबीयांसाठीही महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
काय-काय मिळालं?
चिमुकल्या शिवायसाठी 21 जोड कपडे, 11 लाख रुपये रोख, 20 ग्रॅमची सोन्याची साखळी, 500 ग्रॅम वजनाची चांदीची पाच भांडी, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या चांदीच्या मूर्ती, हात आणि पायांसाठी चांदीच्या बांगड्या, बाळाच्या आई, आजी आणि काकीसाठी सोने-चांदीचे दागिने व कपडे, बाळाच्या नावावर राष्ट्रीय महामार्गालगत (NH) एक प्लॉट, 101 साड्या व पँट-शर्टचे सेट याशिवाय असंख्य खेळण्यांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
या गिफ्टची यादी ऐकून सोशल मीडिया युजर्स चकित झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी आजही समाजात सुरू असलेल्या अशा प्रथांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले, “देव करो आणि सगळ्यांच्या आई-वडिलांकडे इतकीच संपत्ती असो.” दुसऱ्या युजरने गंमतीत विचारले, “बाळाच्या वडिलांची काय चूक होती, त्यांच्यासाठी काहीच तोहफा नाही?” तर तिसऱ्या युजरने म्हटले, “आजही आपला समाज अशाच जुन्या प्रथांमध्ये अडकलेला पाहून आश्चर्य वाटतं.”
Web Summary : A baby's first birthday went viral, with gifts including ₹11 lakh cash, gold jewelry, and a highway-adjacent plot from the uncle. Gifts extended to the baby's mother, grandmother, and aunt, sparking mixed reactions online.
Web Summary : एक बच्चे का पहला जन्मदिन वायरल हो गया, जिसमें मामा ने 11 लाख नकद, सोने के गहने और राजमार्ग के पास एक प्लॉट उपहार में दिया। उपहार बच्चे की माँ, दादी और चाची को भी दिए गए, जिससे ऑनलाइन मिश्रित प्रतिक्रियाएँ हुईं।