Viral Video : अचानक सुरू झाली मुलींची फ्री स्टाइल हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी एकमेकींवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:43 IST2021-07-09T15:41:43+5:302021-07-09T15:43:59+5:30
Social Viral : सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात तुम्ही बघू शकता की, दोन शाळकरी मुली एका गल्लीमध्ये आहेत.

Viral Video : अचानक सुरू झाली मुलींची फ्री स्टाइल हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी एकमेकींवर हल्ला
सामान्यपणे मुलांची भांडणं जास्त बघायला मिळतात. म्हणजे फुल्ल मारामारी. पण मुलीही याबाबतीत कमी नसतात. जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्या त्यांचा संयमीपणा सोडून लाथा-बुक्क्यांनी बोलू लागतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अचानक दोन मुली एकमेकींवर हल्ला करतात आणि एकटी एक मुलगी सडेतोड उत्तरही देते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात तुम्ही बघू शकता की, दोन शाळकरी मुली एका गल्लीमध्ये आहेत. दोघी थेट मारामारी करू लागतात. एक मुलगी आपल्या बचावासाठी दोन मुलींना मारते, त्यांना धक्का देते. त्यानंतर लाथा-बुक्क्यांची बरसात होताना दिसते. आजूबाजूने जाणारे लोक हा प्रकार पाहून अवाक् झाले आहेत. (हे पण बघा : बाबो! भर मंडपात मुलीने नवरदेवाला केला पळून जाण्याचा इशारा? जाणून घ्या Viral व्हिडीओमागचं सत्य)
मुलींची अशाप्रकारची फ्री स्टाइल हाणामारी फार कमीच बघायला मिळते. त्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. मुलीही मुलांसारखी फाइट करू शकतात हे यातून दिसून येतं. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. सतु सैनी नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ शेकडो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत.