Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:46 IST2025-05-21T18:46:29+5:302025-05-21T18:46:55+5:30
Viral Video: व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
Viral Video: विचार करा की, तुम्ही कुणाच्या तरी लग्नात गेला आहात अन् तिथे तुम्हाला एक नाही, तर दोन-दोन जुळे वर-वधू दिसले तर? तुम्ही म्हणाल, असे होऊच शकत नाही. एकाच लग्नात दोन-दोन जुळे वर-वधू! शक्यच नाही. पण, असे प्रत्यक्षात घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दोन जुळ्या भावांचा जुळ्या बहिणींसोबत लग्न होताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एकाच मंडपात दोन जुळ्या बहिणींचे दोन जुळ्या भावांशी लग्न होत असल्याचे दिसून येते. दोन्ही बहिणी आणि दोन्ही भाऊ एकमेकांसारखेच दिसतात. हे पाहून तिथे आलेला वऱ्हाडीदेखील गोंधळून गेला असेल. हा व्हिडिओ कुठला आहेस याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
ही व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर @far.ziengineer नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे, जी आतापर्यंत 2 लाख 18 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. अनेक नेटिझन्स या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, जर दोन्ही जोडपे एकाच घरात राहिले, तर काय होईल याचा विचार करून मला काळजी वाटते. दुसऱ्याने म्हटले, हे व्हीएफएक्स आहे भाऊ, मला विश्वासच बसत नाहीये.