शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: याला म्हणतात नशीब! तरुणाच्या डोक्यावर सापाचा हल्ला, 'या' गोष्टीमुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 16:38 IST

Viral Video: हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Snake Viral Video: साप हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. विषारी साप चावल्याने मानव असो वा प्राणी...वेळेवर उपचार न मिळल्यास मृत्यू होतो. पण, साप उगाच कुणाला येऊन चावत नाही. सापाला त्रास दिला, तरच तो हल्ला करतो. कधी-कधी एखादा नशीबवान व्यक्ती सापाच्या हल्ल्यातूनही वाचतो. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, तो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.

सापाने हल्ला केला, पण...व्हायरल व्हिडीओमध्ये एक झोपडीसारखे दिसणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये व्यक्ती आरामात फोनवर बोलत आहे आणि निसर्गाचा आनंद घेत आहे. पण कदाचित त्या व्यक्तीला माहित नसेल की, निसर्गाची दुसरी बाजू खूप धोकादायक आहे. ही व्यक्ती फोनवर बोलत असताना साप त्याच्यावर मागून हल्ला करतो. यातील सर्वात भयावह बाब म्हणजे साप व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला करतो.

या छोट्याशा गोष्टीमुळे जीव वाचलामात्र टोपीमुळे त्या माणसाचा जीव वाचला. होय, त्या व्यक्तीने डोक्यावर टोपी घातली होती. साप त्याच्यावर हल्ला करतो, तेव्हा सापाचे दात टोपीत अडकतात. साप दात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या डोक्यावरुन टोपी निघते आणि त्यानंतर त्याला साप दिसतो. त्या व्यक्तीने विचारही केला नसेल की, एक साधी टोपी त्याचा जीव वाचवू शकते.  हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून, लोकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे.

@AMAZlNGNATURE नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 7 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. एका यूजरने लिहिले... भावाचे नशीब चांगले होते, नाहीतर त्याला जीव गमवावा लागला असता. दुसऱ्या युजरने लिहिले... इथे साप आणि व्यक्ती दोघेही मूर्ख आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिले... अशा ठिकाणी सावधपणे बसावे.

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया