Video : चक्क बेडकाने केली सापाची शिकार, व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:09 IST2020-02-11T16:07:37+5:302020-02-11T16:09:30+5:30

साप आणि बेडकाच्या भांडणाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील.

Video : The snake hunt made by a frog viral video | Video : चक्क बेडकाने केली सापाची शिकार, व्हिडीओ झाला व्हायरल!

Video : चक्क बेडकाने केली सापाची शिकार, व्हिडीओ झाला व्हायरल!

साप आणि बेडकाच्या भांडणाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका  साप आणि बेडकाच्या भांडणाबद्दल सांगणार आहोत. पण या भांडणाची खास गोष्ट अशी आहे की या भांडणात चक्क बेडकाचा विजय झाला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.  या दोघांच्या फाईटींगचा व्हिडीओ सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे. 

या लढाईत चक्क बेडूक जिंकला आहे.  हा बेडूक हिरव्या रंगाचा आहे. त्याने सापासोबत चालेल्या भांडणात सापालाचं खाऊन टाकलं आहे. या बेडकाने  फक्त ३७ सेकंदात सापाला खाऊन फस्त केलं आहे. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमध्ये साप बेडकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे.

 

मात्र, बेडकाने कसलाही विचार न करता  सापाला जिवंत गिळलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने केलाय त्याचा व्हिडीओसुद्दा वायरल होत आहे. आपल्या पायांनी बेडकाने सापाला आपल्याकडे ओढत खाऊन टाकले आहे. ( हे पण वाचा-Video : शूट दरम्यान महिला रिपोर्टरच्या खांद्यावर चढला साप, पुढे काय झालं ते बघा व्हायरल व्हिडीओत!)

काही दिवसांपूर्वी एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका बिबट्याचा आणि घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओ होता. हा व्हिडीओ मुळात २०१८ तील होता. पण पुन्हा एकदा व्हायरल झाला. हा व्हिडीओ जाम्बियाच्या कॅगयू सफारी लॉजमधील होता. ज्यात एका बिबट्यावर मॉनिटर घोरपडीने आपल्या शेपटीने हल्ला केला. ( हे पण वाचा- Video : घोरपड आणि बिबट्याची ही झुंज पाहून साप अन् मुंगुसाच्या लढाईचा थरार विसराल!)

Web Title: Video : The snake hunt made by a frog viral video