Video:'सर मला लोकशाहीचे मुल्य पायदळी तुडवून मारतात'; चिमुकल्याच भाषण तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:51 IST2023-01-28T15:49:12+5:302023-01-28T15:51:18+5:30
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण लहान असताना मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या शाळेत या दिवसाच उत्साहात नियोजन केलेले असते.

Video:'सर मला लोकशाहीचे मुल्य पायदळी तुडवून मारतात'; चिमुकल्याच भाषण तुफान व्हायरल
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण लहान असताना मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या शाळेत या दिवसाच उत्साहात नियोजन केलेले असते. सकाळी झेंडावंदन होते, यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांची भाषणं होतात. लहान मुलांची भाषण ऐकण्यासारखी असतात. या भाषणाची तयारी विद्यार्थ्यांनी काही दिवस अगोदर केलेली असते, सध्या असेच एका विद्यार्थ्याचे भन्नाट भाषण व्हायरल झाले आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे भाषण एका लहान मुलाचे आहे, प्रजासत्ताक दिना दिवशी हे भाषण केलेले आहे. या चिमुकल्याने लोकशाहीवर भाषण केले आहे. या भाषणात त्या चिमुकल्याने लोकशाहीचे काही भन्नाट उदाहरणे दिली आहेत, ही उदाहरणे ऐकून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुलीच्या इच्छेसाठी आईनं गायलं सुरेल गाणं; अभिनेता सोनू सूदनं दिली मोठी ऑफर
या चिमुकल्याने भाषणाच्या सुरुवातीला विद्यार्थी मित्रांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत."लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो, माकडासारखा झाडावर चढतो तर लोकशाही असल्यामुळे मला माझे वडील काहीच बोलत नाहीत. पण गावातील काही मुलं माझं नाव शाळेतील सरांना सांगतात आणि काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात. पण मी खूप गरिब आहे, माझ्याएवढा गरिब अख्ख्या तालुक्यात कुणीच नसेल" अशा शब्दांत या विद्यार्थ्यांने भाषण केले आहे. या भाषणाने या चिमुकल्याने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
या चिमुकल्याने लोकशाहीचे महत्व आणि लोकशाहीला कसं सध्या पायदळी तुडवले जात आहे, याची उदाहरणे दिली आहेत. ही उदाहरणे ऐकून समोर बसलेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांना हसू आवरता आलेले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.