VIDEO : समुद्रातील खतरनाक वादळात अडकलं विशाल जहाज, नजारा बघून अंगावर येईल शहारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 13:23 IST2024-09-23T13:18:24+5:302024-09-23T13:23:42+5:30
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल झाला असून तो बघून अनेकांना टायटॅनिकच्या क्लायमॅक्सची आठवण येत आहे.

VIDEO : समुद्रातील खतरनाक वादळात अडकलं विशाल जहाज, नजारा बघून अंगावर येईल शहारा!
Viral Video : टायटॅनिक सिनेमा सगळ्यांनीच पाहिला असेल, ज्यात एका विशाल जहाजाच्या समुद्रात बुडण्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. यात दाखवण्यात आलं की, टायटॅनिक जहाज एका ग्लेशिअरला धडक दिल्यानंतर कसं बुडतं. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल झाला असून तो बघून अनेकांना टायटॅनिकच्या क्लायमॅक्सची आठवण येत आहे.
व्हिडिओत दाखवण्यात आलं की, एका विशाल जहाजावर कशाप्रकारे खतरनाक समुद्री लाटा आदळत आहेत. हे जहाज एकप्रकारे उंचच उंच लाटांसोबत लढतच आह आणि बुडण्यापासून वाचत आहे. व्हिडिओत तुम्ही अंगावर शहारे आणणाऱ्या समुद्री लाटा बघू शकता.
हा व्हिडीओ एक अकाऊंटवर @Amazingnature यूजरने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
It absolutely amazes me how these ships and crews survive these violent storms!!😳 pic.twitter.com/kXZvQrErOJ
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 20, 2024
सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ बघून टायटॅनिक सिनेमाचा क्लायमॅक्स आठवला. तर बरेच लोक जहाजाची ताकद आणि त्याच्या चालकाच्या हिंमतीचं कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं की, जहाज खरंच लाटांसोबत लढणाऱ्या एका वॉरिअरसारखं दिसत आहे.
तर अनेक लोक प्रश्नही करत आहे की, हे जहाज या वादळात अडकलं कसं? दरम्यान, जहाजांमध्ये आधुनिक नेव्हिगेशन सिस्टम असतं. जे त्यांना वादळाची माहिती देत असतं. याने चालक दलाला आधीच सतर्क राहण्याची संधी मिळते आणि ते वादळापासून बचावासाठी उपाय योजना करू शकतात.