Viral Video: आजही पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल जगाला माहिती नाही. जेव्हा ही ठिकाणी अचानक सापडतात, तेव्हा तेथील दृश्य पाहून लोक थक्क होतात. जगभरात अनेक अशी लोक आहेत, जी अशाप्रकारच्या गुप्त ठिकाणांना जगासमोर आणण्याचे काम करतात. यामुळे आपल्याला शतकानुशतके तिथे राहणाऱ्या इतिहासाबद्दल आणि लोकांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे राहणाऱ्या मित्रांनी 'अंडरग्राउंड बर्मिंगहॅम' नावाचे इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवर ते विविध बंकरचे एक्सप्लोर व्हिडिओ शेअर करत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही अशाच प्रकारचे जुने बंकर दिसत आहे. या बंकरमध्ये जाताच तुम्ही एका नवीन कल्पनेपलीकडच्या जगात पोहोचता. या बंकरमध्ये कधीकाळी एक कुटुंब राहत होते, त्यांचे जुने सामान अजूनही तिथेच पडून आहे.
व्हिडिओ पाहा
विशेष म्हणजे, हे बंकर इतके मोठे आहे की, त्यात कितीही आत गेले तरी, रस्ते काही संपता संपत नाहीत. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वप्रथम एक जुने फ्रीज दिसते, याशिवाय घरातील विविध वस्तू दिसतात. या बंकरमध्ये झोपायची जागा अन् पाण्याची पाईपलाईनही दिसते. याशिवाय, बंकरमध्ये न संपणारे अरुंद रस्तेही आहेत, जे तुम्हाला बंकरच्या खूप आत घेऊन जातात. चालून चालून तुम्ही थकाल, पण रस्ते संपणार नाहीत.
@undergroundbirmingham या इंस्टाग्राम हँडलवरून व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत या पोस्टला 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर लाखो व्ह्यूज आहेत. याशिवाय अनेकांनी कमेंट केल्या आहेत.