Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 18:37 IST2025-07-10T18:37:16+5:302025-07-10T18:37:53+5:30

एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

video school teacher suffers cardiac arrest in ongoing lecture dies of heart attack | Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद

Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद

पाकिस्तानच्या लाहोरमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका प्रायव्हेट शाळेतील शिक्षकाचा लेक्चर दरम्यान अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आणि सोशल मीडियावर आता व्हायरल झाली. नियाज अहमद असं मृत्यू झालेल्या शिक्षकाचं नाव  आहे, जो इतर शिक्षकांना ट्रेनिंग देत होता. 

नियाज अहमद व्हिडीओमध्ये शिक्षकांना शिकवताना, समजून सांगताना दिसत आहे. याच दरम्यान अचानक बोलता बोलताच तो खाली पडला. उपस्थितांना नेमकं काय झालं हे समजलंच नाही. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. 

लेक्चर सुरू असताना घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याआधी देखील अचानक चालता-बोलता, नाचताना, वर्कआऊट करताना लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कर्नाटकातील हासनमध्ये हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या ४० दिवसांत येथे हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी

लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी तपासणीसाठी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बंगळुरूच्या जयदेव रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या ८ टक्क्यांनी वाढली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, वाढत्या प्रकरणांमध्ये, हासन आणि जवळच्या जिल्ह्यांमधून अनेक लोक खबरदारी म्हणून तपासणीसाठी येत आहेत. दररोज हजारो लोक हृदयाशी संबंधित तपासणीसाठी म्हैसूरच्या जयदेव रुग्णालयात पोहोचत आहेत. यामुळे रुग्णालयात प्रचंड गर्दी आहे.

Web Title: video school teacher suffers cardiac arrest in ongoing lecture dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.