Video: धावत्या Toyota Camry वर कोसळले विमान; कारच्या बिल्ड क्वॉलिटीमुळे वाचले चालकाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:00 IST2025-12-12T18:55:01+5:302025-12-12T19:00:50+5:30
Viral Accident Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Video: धावत्या Toyota Camry वर कोसळले विमान; कारच्या बिल्ड क्वॉलिटीमुळे वाचले चालकाचे प्राण
Viral Accident Video: तुम्ही अनेकदा विमान कोसळल्याचे किंवा सामान्य रस्त्यांवर इमरजन्सी लँडिंग केल्याचे व्हिडिओ पाहिले असतील. आता अशाच प्रकारची घटना अमेरिकेतील फ्लोरिडामधून समोर आली आहे. मात्र, या घटनेत विमान चक्क एका धावत्या Toyota Camry कारवर कोसळले. विशेष म्हणजे, कारची बनावट अतिशय मजबूत असल्यामुळे चालकाचा जीव वाचला.
इंजिन फेल झाल्याने इमरजन्सी लँडिंगचा निर्णय
FAA (फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन) नुसार, Beechcraft 55 या लहान आकाराच्या विमानाचे उड्डाणानंतर इंजिन फेल झाले. त्यानंतर पायलटने हायवे I-95 वर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. पायलटने महामार्गावरील वाहनांना टाळण्याचा प्रयत्न केला, अचानक संतुलन बिघडल्याने ते थेट Toyota Camry कारवर कोसळले.
NEW: One injured after small plane makes emergency landing on I-95 and crashes into a vehicle
— Unlimited L's (@unlimited_ls) December 9, 2025
The small plane made an emergency landing on a Florida highway after losing power in both engines
The aircraft had two people aboard, a 27-year-old pilot and a 27-year-old passenger… pic.twitter.com/Nvs3Avs9HV
चालक किरकोळ जखमी
पाठीमागून येणाऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये कैद झालेल्या फुटेजमध्ये दिसते की, विमान अचानक कारवर आदळते. या धक्क्यामुळे कारचा मागचा भाग आणि छत पूर्णपणे चेंदामेंदा झाले. मात्र, कारची बनावट अतिशय मजबूत असल्यामुळे 57 वर्षीय चालकाचा जीव वाचला. या घटनेत त्याला किरकोळ जखमा आल्या आहेत. सुदैवाने विमानातील पायलट आणि 27 वर्षीय प्रवासीदेखील सुरक्षित आहेत.
कशी आहे Toyota Camry ?
Toyota Camry ही एक प्रीमियम हायब्रिड सेडान आहे. यात ADAS (लेन असिस्ट, अडॅप्टिव क्रूझ कंट्रोल), वेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, 12.3-इंच टचस्क्रीन, JBL साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, सनरूफ, 9 एअरबॅग्स...हे सर्व फीचर्स मिळतात.
Toyota ची बिल्ड क्वालिटी पुन्हा चर्चेत
भारतात Tata Motors च्या मजबुतीचे नेहमीच उदाहरण दिले जाते. मात्र या अमेरिकन घटनेनंतर Toyota च्या सेफ्टीची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. कारचा स्ट्रक्चर जरी कोसळला असला, तरी तिच्या मजबूत सेफ्टी पॉलिसीने चालकाचे प्राण वाचवले, हेच या घटनेचे मोठे यश मानले जात आहे.