नवरी-नवरदेवाला त्रास देत होते मित्र, पंडित संतापला आणि केलं असं काही; बघून व्हाल अवाक्...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:05 IST2024-12-27T13:04:49+5:302024-12-27T13:05:25+5:30
Bride Groom Funny Video: लग्नात पंडितजी नेहमीच दुर्लक्षित असतात. पण या व्हिडिओत पंडिताने वैतागून असा काही कारनामा केली की, सगळे बघतच राहिले.

नवरी-नवरदेवाला त्रास देत होते मित्र, पंडित संतापला आणि केलं असं काही; बघून व्हाल अवाक्...!
Bride Groom Funny Video: सोशल मीडियावर नेहमीच लग्नातील भांडणांचे, गमती-जमतीचे, तर कधी डान्स व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक लग्नातील वेगळा व्हिडीओ समोर आला आहे. लग्नात पंडितजी नेहमीच दुर्लक्षित असतात. पण या व्हिडिओत पंडिताने वैतागून असा काही कारनामा केली की, सगळे बघतच राहिले.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरीदेवाची सप्तपदी सुरू आहे. तर स्टेजवरून पंडित मंगलाष्टकं म्हणत आहेत. यावेळी आजूबाजूला उभे असलेल परिवारातील सदस्य, नवरी-नवरदेवाचे मित्र दोघांनाही त्रास देण्यासाठी जोरजोरात फुलं त्यांच्यावर फेकत आहे. ज्यामुळे नवरी-नवरदेव वैतागले आहेत. ही फुलं पंडिताच्या तोंडावरही लागतात. अशात पंडित जोरात संतापतो आणि हातात असलेलं ताट तरूणांच्या अंगावर फेकतो. अशात नवरी-नवरदेवसहीत सगळेच घाबरतात आणि पंडिताला बघू लागतात.
Pandit ji be like enough is enough 😡
— Raja Babu (@GaurangBhardwa1) December 26, 2024
"Ab jaisi duniya vaise hum" 🤣🤣 pic.twitter.com/uJ352BWNfu
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @GaurangBhardwa1 नावाच्या यूजरने शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, "पंडितचं रिअॅक्शन असं होतं जणू आता बास्स झालं!".
या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच लोक भरभरून या व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'जे केलं ते बरोबर केलं, कारण हे गरजेचं होतं'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'पंडितने कन्टेन्ट बनवला'. तर तिसऱ्यानं लिहिलं की, 'पंडिताने बरोबर केलं, दुसरं कुणी असतं तरी त्यानं तेच केलं असतं'.