एक दूजे के लिए...! व्हीलचेअरवर बसून घेतले 'सातफेरे', भावनिक क्षण सोशल मीडियावर viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 13:42 IST2023-12-13T13:40:53+5:302023-12-13T13:42:14+5:30
नि:स्वार्थी प्रेमाची व्याख्या सांगणारा या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

एक दूजे के लिए...! व्हीलचेअरवर बसून घेतले 'सातफेरे', भावनिक क्षण सोशल मीडियावर viral
Viral Video : लग्न म्हणजे अनेकांसाठी एक खास क्षण असतो. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम जडलंय त्या व्यक्तीसोबत आयुष्यभरासाठी वचनबद्ध होण्याचा हा क्षण असतो. अशाच एका लग्नसोहळ्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगतेय. हा व्हायरल व्हिडीओ प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. हल्ली छोट्या-छोट्या कारणांवरून नाराज होऊन आयुष्यभराचे नाते तोडणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ प्रेमाची परिभाषा सांगणारा आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तरूणी एका दिव्यांग नवरदेवासोबत सात फेरे घेताना दिसत आहे. दरम्यान लग्नाच्या वेळी हा दिव्यांग नवरदेव व्हिलचेअरवर बसला आहे. अशा परिस्थितीतही एकमेकांची साथ न सोडता कणखरपणे उभ्या असलेल्या या जोडप्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वडिलधाऱ्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडत आहे. एका एक्स यूजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओने नेटकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळते आहे. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ :
एक विवाह ऐसा भी, भगवान आप दोनों को हमेसा खुश रखे ❤️ pic.twitter.com/DrxYSOBesC
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) December 12, 2023