Viral Video: खतरनाक काळ्या रंगाच्या सापासोबत खेळणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:16 IST2022-03-08T13:15:29+5:302022-03-08T13:16:49+5:30
Viral Video : सोशल मीडियावरील लोक या मुलीच्या हिंमतीचं कौतुक करत आहेत. साप किती खतरनाक आहे हे दिसतंच आहे. पण ती मुलगी जराही न घाबरता त्याच्यासोबत खेळत आहे.

Viral Video: खतरनाक काळ्या रंगाच्या सापासोबत खेळणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच एकापेक्षा भारी व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. कारण या व्हिडीओत एका लहान मुलगी एका खतरनाक सापासोबत खेळताना दिसत आहे. सोशल मीडियावरील लोक या मुलीच्या हिंमतीचं कौतुक करत आहेत. साप किती खतरनाक आहे हे दिसतंच आहे. पण ती मुलगी जराही न घाबरता त्याच्यासोबत खेळत आहे.
सापाचे किंवा सापांना पकतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर नेहमीच पाहिले असतील. पण यातील साप बघून भीती वाटत आहे. त्यात ही मुलगी बिनधास्तपणे सापासोबत खेळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही सेकंदाचा हा व्हिडीओ हैराण करणारा आहे. सोशल मीडियावरील लोक या मुलीचं भरभरून कौतुक करत आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर snakemasterexotics नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाइक्स पाऊस पडत आहे.