शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

VIDEO: माकडाने केले कुत्र्याच्या पिलाचे अपहरण; नेटकरी म्हणाले- खंडणीत काय मागितले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:47 IST

मागे एकदा माकड आणि कुत्र्याच्या टोळीयुद्धाचे प्रकरण समोर आले होते. हा व्हिडिओ पाहून त्याचीच आठवण येईल.

Monkey vs Dog : 2021 मध्ये कुत्रे आणि माकडांच्या टोळीयुद्धाचे प्रकरण खूप चर्चेत आले होते. बीड जिल्ह्यातील एका गावात कुत्र्यांच्या टोळीने माकडाच्या पिलाला मारल्यानंतर माकडांनी दिसेल त्या कुत्र्याच्या पिलाला मारण्याचा प्रकार सुरू केला. त्यावेळेस माकडांनी 200 हून अधिक कुत्रे मारले. ते कुत्र्यांना उचलून झाडांवर किंवा छतावर न्यायचे अन् वरुन खाली फेकायचे. 

त्या घटनेच्या संबंधी अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते व्हिडिओ पाहून लोकही विचारात पडले होते की, माणसांप्रमाणे बदला घेण्याची वृत्ती माकडांमध्ये कशी येऊ शकते. संपूर्ण देशभर ते प्रकण गाजले होते. याच्याशीच संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक माकड कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन छतावरुन पळताना दिसत आहे.

हे प्रकरण राजस्थानच्या जयपूरमधील गंगौरी बाजारचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुकानाच्या छतावर एक माकड कुत्र्याचे पिल्लू घेऊन बसले आहे. काही सेकंदांनंतर ते तिथून उठते आणि पिलाला घएऊन निघून जाते. त्याने कुत्र्याच्या पिलाला प्रेमापोटी उचलले की मारण्यासाठी उचलले, हे कळू शकले नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मजा घेत आहेत.

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जयपूरच्या गंगौरी मार्केटमध्ये माकडाने कुत्र्याचे बाळ पळवले'. हा व्हिडिओ 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लोकांनी व्हिडिओलाही लाइक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण 'त्यांचे टोळीयुद्ध सुरु आहे' असे म्हणत आहेत, तर काही जण 'खंडणीची रक्कम किती असेल?' असे म्हणत आहेत.  

टॅग्स :dogकुत्राMonkeyमाकडwarयुद्धRajasthanराजस्थानSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके