Video: सगळीकडे पैसे! नवरीवर लग्नात ८ कोटी रुपये उधळले? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचं सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:38 IST2026-02-18T13:34:55+5:302026-02-18T13:38:09+5:30

Wedding Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघून लोक अवाक् होत आहेत. व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरी उभे आहेत आणि त्यांच्यावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडत आहे. 

Video: Money everywhere! Rs 8 crores wasted on bride's wedding? What is the truth behind the viral video? | Video: सगळीकडे पैसे! नवरीवर लग्नात ८ कोटी रुपये उधळले? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचं सत्य काय?

Video: सगळीकडे पैसे! नवरीवर लग्नात ८ कोटी रुपये उधळले? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचं सत्य काय?

Viral Video: लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. लग्नाच्या मंडपात नवरदेव-नवरी उभे आहेत आणि त्यांच्यावर कुटुंबातील लोक पैसे उधळत आहेत. खाली सगळीकडे नोटा पडल्या आहेत. काही लोक त्या उचलत आहेत. हा व्हिडीओ पंजाबमधील असून, कुटुंबीयांना ८.५ कोटी रुपये उधळल्याचा दावा केला गेला. पण, हे सत्य नाही. नवरदेवाच्या भावानेच याबद्दल आता सविस्तर खुलासा केला आहे. 

पंजाबमधील तरनतारणमधील हा व्हिडीओ आहे. नवरदेव आणि नवरीवर लोक पावसासारखा पैसा उधळत आहेत. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी नवदाम्पत्यावर ८.५ कोटी रुपयांची उधळण केली, असे दावे आता केले जात आहेत. पण ते खरे नाहीत. 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघा

लग्नाचे व्यवस्थापन करणाऱ्या ईव्हेंट मॅनेजर आणि डीजे मालकाने सांगितले की, जवळपास ४ लाख रुपये उधळण्यात आले, यात डॉलर्सचाही समावेश आहे.  

नवरदेवाचा भाऊ सिंकदर सिंग म्हणाला की, "माझ्या भावाचा ऑस्ट्रेलियामध्ये ट्रकचा बिझनेस आहे. हे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पार पडले. लग्नातील सेलिब्रेशनचा भाग म्हणून पैसे उधळण्यात आले. २ लाखांपर्यंत पैसे उधळण्यात आले. सोशल मीडियावर आकडे फुगवून कोंटीमध्ये सांगितले जात आहेत. पण, ते चुकीचं आहे. 

Web Title : विवाह वीडियो: क्या दुल्हन पर ₹8 करोड़ की बारिश हुई? सच्चाई सामने आई!

Web Summary : पंजाब में एक विवाह वीडियो वायरल हुआ जिसमें एक जोड़े पर पैसे बरसाए गए। ₹8.5 करोड़ खर्च करने के दावे झूठे हैं। दूल्हे के भाई ने स्पष्ट किया कि केवल ₹2 लाख का उपयोग उत्सव के लिए किया गया था।

Web Title : Wedding Video: Did Bride Get Showered with ₹8 Crore? Truth Revealed!

Web Summary : A viral wedding video showed money showered on a couple in Punjab. Claims of ₹8.5 crore being spent are false. The groom's brother clarified only ₹2 lakh was used for celebration.