Video : पती लवकर आला घरी अन् अर्धनग्न बॉयफ्रेंड खिडकीतून २० फूट खाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 14:57 IST2020-02-04T14:39:29+5:302020-02-04T14:57:26+5:30
पती घरी नसल्याचं पाहून महिलेचा बॉयफ्रेन्ड तिला भेटायला आला आणि अचानक महिलेचा पती घरी आला.

Video : पती लवकर आला घरी अन् अर्धनग्न बॉयफ्रेंड खिडकीतून २० फूट खाली
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून घडणाऱ्या कितीतरी विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पती घरी नसल्याचं पाहून महिलेचा बॉयफ्रेन्ड तिला भेटायला आला आणि अचानक महिलेचा पती घरी आला. रंगेहाथ पकडले जाऊ नये म्हणून महिलेचा बॉयफ्रेन्ड घराच्या खिडकीत लटकला होता आणि लोक त्याला बघत होते.
बराच वेळ ही व्यक्ती खिडकीमध्ये लटकून होती, पण शेवटी त्याच्या हातांनी साथ सोडली आणि तो खाली पडला. तो साधारण २० फूट खाली जाऊन पडला. इतक्यात महिलेचा आवाज आला, 'ओह माय गॉड'. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियातील लोक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. पण हे प्रकरण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं आहे की, नाही हे काही स्पष्ट झालं नाही.
@Rossmac212 नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला गमतीदार कॅप्शन दिलं. त्याने लिहिले की, 'महिलेचा पती घरी लवकर आला'. हा व्हिडीओ आतापर्यंत २० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय.
The woman’s husband came home early😂 pic.twitter.com/eIXwco480N
— Ross McCulloch (@Rossmac212) January 30, 2020
'द सन' च्या रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ स्वित्झर्लॅंडचा आहे. यात एक वयस्क व्यक्ती अंडरवेअर आणि सॉक्स घालून खिडकीत लटकून आहे. तो खाली पडू नये म्हणून अनेक प्रयत्न करतोय, पण जास्त वेळ तग धरू शकत नाही.
सुदैवाने तो खाली एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनवर पडतो. व्हॅनवरून तो खाली पडतो आणि बराच वेळ तसाच पडून राहतो. हा व्हिडीओत शूट करत असलेल्या महिलेचा आवाजही यात येतो. Zurich Cantonal Police विभागाला या घटनेबाबत सगळी माहिती मिळाली आहे. पण त्यांनी ती माहिती जाहीर केली नाही. फक्त या व्यक्तीचं नाव Wallisellen असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.