Video of man saving his wife from bobcat will shock you | VIDEO : जंगली बोक्याने महिलेवर अचानक केला हल्ला, पतीने असा वाचवला तिचा जीव!

VIDEO : जंगली बोक्याने महिलेवर अचानक केला हल्ला, पतीने असा वाचवला तिचा जीव!

ही घटना आहे अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनातील. इथे एक महिला घराबाहेर आली आणि कारकडे जात असताना अचानक तिच्यावर एका जंगली बोक्याने हल्ला केला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पत्नीच्या पतीने तिचा जीव कसा वाचवला हेही बघायला मिळतं.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जंगली बोक्याला हाती पकडून आहे. त्याआधी तो काहीतरी सामान गाडीच्या बोनेटवर ठेवतो. त्यानंतर त्याची पत्नी बाहेर येते. तिच्या हातात एक बॅग आहे. अचानक ती ओरडायला लागते. एक जंगली बोक्या तिच्यावर अचानक हल्ला करतो. तेव्हाच पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो तिच्या मदतीसाठी धावतो. (हे पण वाचा : VIDEO : बघा पाण्याचा बुडबुडा गोठून बर्फ कसा होतो, कधी पाहिला नसेल असा नजारा!)

इतक्यात तिचा पती जंगली बोक्याला उचलतो. त्याची पत्नी ओरडत असते. पण तो काही हार मानत नाही. तो बोक्याला उचलून बाजूला फेकतो. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ४६ सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

न्यूयॉर्क टाइम्सनुसार, नंतर या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी नंतर या जंगली बोक्याला पकडून जीवे मारलं. त्याला रेबिज झाला होता. त्याने केलेल्या हल्ल्यात पती आणि पत्नी दोघांनाही अनेक जखमा झाल्या आहेत. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video of man saving his wife from bobcat will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.