खतरनाक! तरूणाने विषारी किंग कोब्राला केलं किस, व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 12:44 IST2023-08-19T12:44:13+5:302023-08-19T12:44:32+5:30

व्हिडिओत तुम्ही किंग कोब्राला तोंड उघडलेलं बघू शकता. तेच माइक होल्सटन नावाची ही व्यक्ती हळूहळू त्याच्या जवळ येते आणि मग सापाच्या डोक्यावर किस करते.

VIDEO : Man kisses deadly cobra on head watch viral video | खतरनाक! तरूणाने विषारी किंग कोब्राला केलं किस, व्हायरल झाला व्हिडीओ

खतरनाक! तरूणाने विषारी किंग कोब्राला केलं किस, व्हायरल झाला व्हिडीओ

सामान्यपणे सापाला बघितल्यावर कोणत्याही व्यक्तीला भीती वाटते आणि ते सापाला दुरून पाहूनच पळायला लागतात. पण काही लोक असे नसतात. काही लोक सापांसोबत असं काही करतात जे बघूनच हैराण व्हायला होतं. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती सापाला किस करताना दिसत आहे. 

व्हिडिओत तुम्ही किंग कोब्राला तोंड उघडलेलं बघू शकता. तेच माइक होल्सटन नावाची ही व्यक्ती हळूहळू त्याच्या जवळ येते आणि मग सापाच्या डोक्यावर किस करते. मग लगेच तो मागे सरकतो. साप तोपर्यंत काही रिअॅक्ट करत नाही. पोस्टच्या कॅप्शनमध्ये माइकने लिहिलं की, यात इतकं विष आहे की, दंश मारल्यावर 10,000 पाउंड वजन असलेल्या हत्तीचाही जीव जाईल.

ही पोस्ट 13 ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत याला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. 24 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, आता वेळ आली आहे की, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करावी. कारण हे फार धोकादायक आहे. दुसऱ्याने लिहिलं की, तू रिअल टार्जन आहे.

Web Title: VIDEO : Man kisses deadly cobra on head watch viral video