VIDEO : लाकूड तोडत होती व्यक्ती, दोन तुकडे झाल्यावर आत जे दिसलं ते पाहून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:51 IST2024-11-08T14:47:53+5:302024-11-08T14:51:44+5:30

Viral Video : एक अचंबित करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्ही थक्क व्हाल.

VIDEO : Man cut log gets enormous beehive inside it large stock of honey | VIDEO : लाकूड तोडत होती व्यक्ती, दोन तुकडे झाल्यावर आत जे दिसलं ते पाहून व्हाल अवाक्!

VIDEO : लाकूड तोडत होती व्यक्ती, दोन तुकडे झाल्यावर आत जे दिसलं ते पाहून व्हाल अवाक्!

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे आश्चर्यकारक असतात. काही व्हिडिओमधून अशा काही नैसर्गिक गोष्टी बघायला मिळतात ज्यांवर आपला विश्वासच बसत नाही. असाच एक अचंबित करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्ही थक्क व्हाल. यात एक व्यक्ती लाकूड तोडताना दिसत आहे, त्यानंतर त्यातून जे निघतं ते अवाक् करणारं आहे.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती लाकूड तोडत आहे. हे लाकूड पोकळ झालेलं आहे. काही वेळाने लाकडाचे दोन तुकडे होतात आणि आत असं काही दिसतं ज्याचा तुम्ही अंदाजही लावला नसेल. आत मधमाश्यांचे पोळे दिसत आहेत. अशाप्रकारे लाकडाच्या आत मधमाश्यांचे पोळे दिसल्याने लोकही अवाक् झाले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gunsnrosesgirl3 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारोंनी लाईक केला आहे. यावर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, हे अविश्वसनीय आहे. दुसऱ्याने लिहिलं की, निसर्गापेक्षा मोठा दुसरा आर्किटेक्टर कुणीच नाही. 

Web Title: VIDEO : Man cut log gets enormous beehive inside it large stock of honey