शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

वाह रे जुगाड! एका स्कूटरवर सगळ्यांना बसता येत नव्हतं, म्हणून दोन स्कूटर एकत्र केले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 5:52 PM

Social Viral : जर तुमच्याकडे मोठी गाडी नसेल आणि तुमचा परिवार मोठा असेल तर, अशात इतका मोठा परिवार घेऊन बाहेर कसं जायचं असा प्रश्न पडतो.

Social Viral :  जुगाड आहे तर काहीही शक्य आहे. जुगाडाबाबत सांगायचं तर भारतात जुगाडाशिवाय काम होत नाही. कोणतंही काम सोपं करण्यासाठी लोक जुगाडाची पद्धत वापरतात. किंवा असं म्हणा की भारतीय लोकांना जुगाडाची सवय पडली आहे. लोक प्रत्येक कामासाठी जुगाड वापरतात. असंच एक उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. अनेकदा तर अशक्य कामही जुगाडानेच शक्य होतं. 

जर तुमच्याकडे मोठी गाडी नसेल आणि तुमचा परिवार मोठा असेल तर, अशात इतका मोठा परिवार घेऊन बाहेर कसं जायचं असा प्रश्न पडतो. अशात अनेकदा एकाच परिवारातील सगळे लोक एकत्र बाहेर जाऊ शकत नाहीत. पण एका व्यक्तीने असं डोकं लावलं की, त्याचा पूर्ण परिवार एकाच वेळी बाहेर जाऊ शकतो. तेही एकाच गाडीवर बसून.व्हायरल झालेला हा व्हिडीओ ट्विटरवर  @adilnargolwala नावाच्या यूजरने शेअर केला आहे.

व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, गरज ही सर्व आविष्कारांची जननी आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्तीने दोन स्कूटर एकत्र जोडून एक मोठी स्कूटर तयार केली. त्याने एका स्कूटरचा मागचा भाग काढला आणि दुसऱ्या स्कूटरचा पुढचा भाग काढला. ते दोन्ही भाग जोडले. ज्यामुळे स्कूटर मोठी झाली. यावर चार लोक सहजपणे बसू शकतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके