Viral Video: घोड्यावर बसून एन्जॉय करत होती तरूणी, मग जे झालं ते बघून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 13:21 IST2021-09-29T13:18:37+5:302021-09-29T13:21:22+5:30
घोडेस्वारी करणं अनेक लोकांना आवडतं. काही लोक तर अशी घोडेस्वारी करतात की, बघणारे बघतच राहतात. तर काही लोकांचा यावेळी पोपटही होतो.

Viral Video: घोड्यावर बसून एन्जॉय करत होती तरूणी, मग जे झालं ते बघून व्हाल हैराण
हे तर सर्वांनाच माहीत आहे की, प्रत्येकाची मजा-मस्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मस्ती करण्यासाठी लोक अनेकदा अशा अशा गोष्टी करतात ज्या बघून लोक हैराण होतात. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक तरूणी घोड्यावर बसून आहे. पण अचानक तिच्यासोबत असं काही होतं की, लोक पोट धरून हसू लागतात.
घोडेस्वारी करणं अनेक लोकांना आवडतं. काही लोक तर अशी घोडेस्वारी करतात की, बघणारे बघतच राहतात. तर काही लोकांचा यावेळी पोपटही होतो. एका तरूणीसोबतही असंच काहीसं झालंय. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी घोड्यावर बसून सैर करत आहे. सुरूवातीला तर सगळं काही सामान्य वाटतं. तरूणी आरामात घोड्यावर बसलेली असते. पण काही वेळातच घोडा अचानक जागेवर उड्या मारू लागतो. त्यामुळे तरूणी घोड्यावरून थेट लोखंडी जाळीवर जाऊन पडते.
घोड्याने ज्याप्रकारे तरूणीचा पोपट केला ते बघून असं वाटतं की, ती आता तिच्या आयुष्यात पुन्हा कधी घोड्यावर बसणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा मजेदार व्हिडीओ को 'ree4_reels' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.