बेधडक! "आज मी काम..."; मिलेनियल बॉसने वाचले Gen-Z कर्मचाऱ्यांचे खरे अन् भन्नाट ई-मेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:36 IST2026-02-18T18:35:22+5:302026-02-18T18:36:18+5:30

जेन-झी कर्मचाऱ्यांच्या ई-मेल्सची ही गोष्ट देखील यापेक्षा वेगळी नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Video - ‘Hi, Nahi Karunga Kaam, Bye’: Millennial Boss Reads Out ‘Honest’ Gen Z Emails | बेधडक! "आज मी काम..."; मिलेनियल बॉसने वाचले Gen-Z कर्मचाऱ्यांचे खरे अन् भन्नाट ई-मेल्स

बेधडक! "आज मी काम..."; मिलेनियल बॉसने वाचले Gen-Z कर्मचाऱ्यांचे खरे अन् भन्नाट ई-मेल्स

जेव्हा "अतिशय प्रामाणिक असणं" आणि "स्वतःला प्राधान्य देणं" या वैशिष्ट्यांचा विचार केला जातो, तेव्हा 'जेन-झी' (Gen-Z) पिढी कधीही निराश करत नाही. आजवर सोशल मीडियावर अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे तरुण कर्मचाऱ्यांनी त्यांच्या 'स्पष्ट' उत्तरांनी आधीच्या पिढीतील लोकांना निशब्द आणि चकित केलं आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

जेन-झी कर्मचाऱ्यांच्या ई-मेल्सची ही गोष्ट देखील यापेक्षा वेगळी नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक 'मिलेनियल' मॅनेजर तिला तिच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आलेले काही अत्यंत 'प्रामाणिक' ई-मेल्स वाचताना दिसत आहे. मॅनेजरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


"आज व्हायब्स (Vibes) बरोबर वाटत नाहीत म्हणून सुट्टी हवी आहे" पासून ते "मी आज रजेवर आहे, पण मी आजारी नाही किंवा प्रवासातही नाही, फक्त थकलो आहे म्हणून सुट्टी घेतोय" आणि "आज मी काम करणार नाही" इथपर्यंत या ई-मेल्समध्ये कशाचीही कमतरता नव्हती. हे सर्व ई-मेल्स कोणत्याही चौकटीत न बसणारे होते.

"आम्ही कधी इतके प्रामाणिक होणार?" (Hum kab honge honest?) असं कॅप्शन देत व्हि़डीओ शेअर केला आहे. तसेच व्हिडिओवर "रीडिंग जेन झेड ई-मेल्स" असं लिहिलं होतं. हा व्हिडीओ 'अपर्णा उपाध्याय' नावाच्या हँडलवरून रेडिटवर शेअर करण्यात आला होता. केवळ एका दिवसात या पोस्टला १ लाख ६७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडिओवर नेटीझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने किस्सा सांगितला, "एकदा माझ्या मॅनेजरने मला सांगितलं की, मी ३ मिनिटं उशिरा आलो आहे, त्यामुळे ती अर्ध्या दिवसाची रजा मानली जाईल. त्यावर मी ऑफिस सोडून निघून गेलो आणि त्याला मेसेज केला की, आता ती पूर्ण दिवसाची सुट्टी समजा." तर दुसऱ्याने लिहिलं, "मी मेंटल हेल्थ डे आहे असे सांगून रजा घेतली होती."

Web Title : मिलेनियल बॉस ने पढ़े जेन-ज़ी के बेधड़क ई-मेल: 'आज काम नहीं करूंगा'

Web Summary : एक मिलेनियल मैनेजर ने जेन-ज़ी कर्मचारियों के स्पष्ट ई-मेल का एक वायरल वीडियो साझा किया, जो ईमानदारी और आत्म-देखभाल को प्राथमिकता देते हैं। ई-मेल में खराब वाइब्स या थकान के कारण छुट्टी के अनुरोध शामिल थे, जिससे कार्यस्थल की ईमानदारी पर मजेदार प्रतिक्रियाएं आईं।

Web Title : Millennial Boss Reads Hilarious, Honest Gen-Z Emails: 'I Won't Work Today'

Web Summary : A millennial manager shared a viral video reading candid emails from Gen-Z employees, who prioritize honesty and self-care. Emails included requests for days off due to bad vibes or simply feeling tired, sparking humorous reactions online about workplace honesty.