VIDEO : फुलांनी नाही तर चिप्सच्या पॅकेट्सने सजवली नवरदेवाची कार, वरात घेऊन गेला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:17 IST2024-04-04T16:04:32+5:302024-04-04T16:17:59+5:30

सध्या नवरदेवाच्या गाडीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

VIDEO : Groom's car decorated not with flowers but with packets of chips | VIDEO : फुलांनी नाही तर चिप्सच्या पॅकेट्सने सजवली नवरदेवाची कार, वरात घेऊन गेला आणि...

VIDEO : फुलांनी नाही तर चिप्सच्या पॅकेट्सने सजवली नवरदेवाची कार, वरात घेऊन गेला आणि...

भारतासारख्या देशात लग्नाला फार महत्व असतं. लग्न मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने पार पाडलं जातं. लग्न एक असा सोहळा असतो ज्यात खाण्या-पिण्यापासून ते नाच-गाण्यापर्यंत सगळं असतं. लग्नात नवरदेवाची गाडीला सजवणं ही एक फारच महत्वाची बाब असते. पण सध्या नवरदेवाच्या गाडीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

सतपाल यादव नावाच्या यूजरने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात नवरदेव एका कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि ही गाडी चिप्सच्या पॅकेटने सजवलेली आहे. या व्हिडीओला 1.7 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. तसेच लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.

सोशल मीडिया यूजर या डेकोरेशनला एक यूनिक आयडिया म्हणत आहेत. तर काही लोकांना प्रश्न पडलाय की, एक नवरदेव आपल्याच लग्नात असं का करेल.

व्हिडीओत बघू शकता की, चिप्सचे पॅकेट लावलेली ही कार समोर येताच लोक तिला जागा करून देतात. कार समोर आली की, त्यावर चिप्सचे वेगेवगळे पॅकेट्स दिसतात. आजकाल बरेच लोक आपलं लग्न यादगार करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. तसाच काही हा प्रकार असू शकतो. कुणी काहीही म्हणो पण ही जरा हटके आयडिया अनेकांना आवडली आहे. 
 

Web Title: VIDEO : Groom's car decorated not with flowers but with packets of chips