शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:देव तारी त्याला कोण मारी! पाचव्या मजल्यावरून पडलेल्या चिमुकलीचा झेल घेऊन वाचवला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:40 IST

चीनमधील एका व्यक्तीने इमारतीवरून पडलेल्या २ वर्षीय चिमुकलीचा अचूक झेल घेऊन जीव वाचवला आहे.

बीजिंग : चीनमधील एका व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय देणाऱ्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे की चिमुकल्या मुलीसाठी एक तरूण देवदूत बनला आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडलेल्या लहान बाळाचा अचूक झेल घेऊन व्यक्तीने त्याला जीवनदान दिले आहे. खर तर ही लहान मुलगी पाचव्या मजल्यावरील खिडकीला लटकत असताना ही घटना घडली. 

दरम्यान, चीनमधील झेजियांग प्रांतातील तोंगजियांग मधील या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आपल्यातील हिरो असा उल्लेख करत त्यांनी झेल घेणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक लहान मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीला लटकत आहे. मुलीला पाहताच तेथील एका व्यक्तीने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि ती खाली पडताच तिचा अचूक झेल घेतला. ती संबंधित व्यक्ती योग्य वेळीच पोहचली नसती तर काय झाले असते याची कल्पना देखील करणे कठीण आहे. 

शेन डोंगने जिंकली अनेकांची मने साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार, मुलीचा जीव वाचवणारी व्यक्ती ३१ वर्षीय असून त्याचे नाव शेन डोंग असे आहे. त्याने सांगितले की, त्याला जेव्हा पहिल्या मजल्यावरील छताच्या बाजूला असलेल्या पत्र्याचा आवाज ऐकू आला तेव्हा तो सतर्क झाला आणि मुलीचा झेल घेतला. २ वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला असून मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली आली होती अशी अधिक माहिती त्याने दिली. घटनेनंतर मुलीला इस्पितळात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, मुलीच्या पायांना आणि फुफ्फुसांमध्ये दुखापत झाली आहे मात्र तिची प्रकृती स्थिर आहे. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलchinaचीनTwitterट्विटर