Video: मुलगी रुळावर पडली, ट्रेन अंगावरुन गेली; 'सुपरमॅन'प्रमाणे बापाने वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:08 IST2025-06-17T16:05:17+5:302025-06-17T16:08:32+5:30
Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: मुलगी रुळावर पडली, ट्रेन अंगावरुन गेली; 'सुपरमॅन'प्रमाणे बापाने वाचवला जीव
Viral Video : एक बाप आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. याची प्रचिती एका व्हायरल व्हिडिओतून येईल. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एका बापाने जे केले, ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनच्या पटरीवर पडलेली दिसते, तर ट्रेन वेगाने तिच्या अंगावरुन जाते. पण, मुलीला वाचवण्यासाठी वडीलांनी 'सुपरमॅन'प्रमाणे उडी मारली आणि ट्रेन जाईपर्यंत मुलीला घट्ट पकडून ठेवले.
जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इजिप्तमधील इस्माइलिया रेल्वे स्टेशनवर २०२० साली घडली असून, हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक मुलगी ट्रेनखाली पडल्याचे दिसत आहे, तर तिचे वडील मुलीला वाचवण्यासाठी ट्रेन जाईपर्यंत तिच्या अंगावर झोपून राहतात. काही वेळानंतर ट्रेन निघून जाते, पण सुदैवाने दोघांना एक ओरखडाही लागत नाही.
Dad shields his daughter with his body after she stepped into a train’s pathpic.twitter.com/Blqs1UISc8
— Interesting things (@awkwardgoogle) June 16, 2025
या घटनेचा स्टेशनवर उपस्थित असलेल्या व्यक्तीने रेकॉर्ड केला असून, पुन्हा एकदा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत दोघांचाही जीव वाचल्यानंतर लोक टाळ्या वाजवू लागतात आणि भावनिक होऊन देवाचे आभारही मानतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला असून, नेटकरी या वडिलांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, "हा बाप खरा सुपरमॅन आहे! आपल्या मुलीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला." दुसऱ्याने कमेंट केली की, "हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझे डोळे पाणावले. वडिलांचे प्रेम जगात सर्वात मोठे आहे."