Video: मस्करीची कुस्करी, मागून धक्का दिल्याने तरुणी ६० फूट खाली जाऊन पडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 12:18 IST2018-08-10T12:17:20+5:302018-08-10T12:18:40+5:30
गंमतीत केलेली एखादी गोष्ट कशी अंगलट येऊ शकते याचं एक ताजं उदाहरण वॉशिंग्टनमध्ये समोर आलं आहे.

Video: मस्करीची कुस्करी, मागून धक्का दिल्याने तरुणी ६० फूट खाली जाऊन पडली!
वॉशिंग्टन : गंमतीत केलेली एखादी गोष्ट कशी अंगलट येऊ शकते याचं एक ताजं उदाहरण वॉशिंग्टनमध्ये समोर आलं आहे. इथे एका १६ वर्षीय मुलीला एका महिलेने पुलावरुन ६० फूट खाली नदीत ढकलल्याची ही घटना आहे. रिपोर्टनुसार, त्या मुलीला उंचीची भीती वाटत होती आणि ती खाली उडी मारण्यासाठी नकार देत होती. अशात अचानक तिला माहीत नसताना धक्का देण्यात आला.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ Ashley Mahree ने मंगळवारी यूट्यूबवर अपलोड केलाय. रिपोर्टनुसार, ही घटना वॉशिंग्टनच्या योकॉल्टमधील लुईस नदीच्या पुलावर झाली. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ती मुलगी पुलावर उभी आहे आणि ती तिच्यासोबतच्या व्यक्तींना खाली उडी मारण्यासाठी नकार देत आहे. अचानक एका महिलेने तिला ६० फूट खाली ढकलले. सुदैवाने या मुलीचा जीव वाचला.
व्हि़डीओसोबत लिहिले गेले आहे की, ही मुलगी आता रुग्णालयात आहे. ती गंभीर जखमी झाली असून तिच्या मणक्यासह फुफ्फुसाला आणि मानेला जखमा झाल्या आहेत. पण या गंमतीत या मुलीचा जीव गेला असता. ज्या महिलेने या १६ वर्षीय मुलीला ज्या महिलेने धक्का दिला त्या महिलेची ओळख पटली आहे. पण तिचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये.