बाई...! केवळ टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये शिरल्या ४ तरूणी, प्रवाशांची 'अशी' झाली हालत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:44 IST2024-11-30T16:29:37+5:302024-11-30T16:44:01+5:30
Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही तरूणींना मेट्रो प्रवास करताना बघण्यात आलं. या तरूणी मेट्रोत असलेल्या प्रवाशांचे हावभाव कॅप्चर करत आहेत.

बाई...! केवळ टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये शिरल्या ४ तरूणी, प्रवाशांची 'अशी' झाली हालत!
Viral Video : सोशल मीडियावर मेट्रो स्टेशनसंबंधी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. दिल्लीच्या मेट्रोचेही अनेक व्हिडीओ चर्चेत असतात. काही दिवसांआधी कमी कपड्यातील एका तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून चांगलाच वाद पेटला होता. आता मेट्रोमधील आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फरक इतकाच आहे की, हा व्हिडीओ भारतातील नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही तरूणींना मेट्रो प्रवास करताना बघण्यात आलं. या तरूणी मेट्रोत असलेल्या प्रवाशांचे हावभाव कॅप्चर करत आहेत. तरूणींचा हा अवतार पाहून लोक अवाक् झाले आहेत. तर काही पुरूष त्यांचे फोटो-व्हिडीओ काढत आहेत. इतकंच नाही तर या तरूणी प्रवाशांसोबत सेल्फीही काढत आहे.
व्हिडिओत बघू शकता की, चार तरूणी टॉवेल गुंडाळून आणि गॉगल लावून मेट्रो स्टेशनमध्ये आल्या. त्यानंतर त्या मेट्रोमध्ये बसल्या. एकमेकींच्या सेल्फी घेऊ लागल्या. अचानक अशा अवतारात समोर आलेल्या तरूणी पाहून प्रवाशी अवाक् झाले.
हा व्हिडीओ @mimisskate नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक केलंय आणि गमतीदार कमेंट्सही केल्या. एका यूजरने लिहिलं की, 'असं वाटतं या महिला थेट बाथरूममधून मेट्रोत आल्यात'.