Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:16 IST2025-10-13T20:12:27+5:302025-10-13T20:16:20+5:30
Ind vs WI Matac Viral Video: दिल्लीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. याच सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
Ind vs WI Viral Video: दिल्लीमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्या दरम्यान एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. याचा व्हिडीओ एका क्रिकेट चाहत्याने मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ एका कपलचा असून, त्यांच्यातील भांडणावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एकीकडे मैदानात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विजयासाठी अटीतटीची लढत सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतही प्रेमळ वाद सुरू होता. एक तरुण तरुणीसोबत मॅच बघत बसलेला होता. लाईव्ह मॅच सुरू असताना कॅमेऱ्यात ते दोघे कैद झाले.
आधी दोन चापटा मारल्या, नंतर त्याची मान धरली
दोघांमध्ये मस्करी सुरू असल्याचे दिसत आहे. तरुण हसत असतानाच तरुणीने त्याचा गालावर मारली, पण त्याने ती चुकवली. त्यानंतर तिने परत रागात त्याला मारली. त्यानंतर ते दोघेही हसायला लागले. त्यानंतर तरुणीने त्याची मान धरली आणि त्याला काहीतरी सांगू लागली.
हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने पोस्ट केला असून, तो काय म्हणाला असावा? असा मजेशीर प्रश्नही त्याने विचारला आहे.
Bruhhh ......😄😂
— chakr (@chkrdhr_) October 13, 2025
What he might have said ? #INDvsWIpic.twitter.com/73rIxdPAbw
वेस्ट इंडिजचा दुसऱ्या डावातील खेळ सुरू असताना हे घडले. दोघांची मस्करी सुरू असताना हे घडलं, पण नेटकऱ्यांना चर्चेसाठी विषय मिळाला. काहींनी म्हटले की हेच जर तिच्यासोबत केलं असतं तर? आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.