जमिनीच्या वादावरून सासरा आणि सूनेत हाणामारी, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 14:42 IST2021-07-21T14:41:48+5:302021-07-21T14:42:32+5:30

बाचाबाचीने सुरू झालेला वाद मारहाण करण्यापर्यंत पोहोचला. सासरा काठीने सूनेला मारू लागला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO : Fight between father in law and daughter in law in baghpat watch video | जमिनीच्या वादावरून सासरा आणि सूनेत हाणामारी, व्हिडीओ झाला व्हायरल

जमिनीच्या वादावरून सासरा आणि सूनेत हाणामारी, व्हिडीओ झाला व्हायरल

कौटुंबिक जमिनीचे वाद हे नेहमीच कोर्टात गेल्यावर सोडवले जातात. पण त्याआधी दोन पक्षांमध्ये अनेकाद भांडणं, मारामारी होते. यूपीच्या बागपत जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादावरून इथे एक सून आणि सासऱ्यात मारामारी झाली. बाचाबाचीने सुरू झालेला वाद मारहाण करण्यापर्यंत पोहोचला. सासरा काठीने सूनेला मारू लागला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सासरा आणि सूनेच्या मारहाणीच्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बराचवेळ दोघांमध्ये ओढाताण सुरू होती. नंतर सासऱ्याने मोठी काठी घेत सूनेला मारणं सुरू केलं. तर आपल्या बचावासाठी सूनेने ती काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला काही यश आलं नाही. तुम्ही बघू शकता की, सासरा सूनेवर लागोपाठ काठीने हल्ला करत आहे. शेतात झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या भांडणावर स्थानिक लोकांनी सांगितलं की, हे कौटुंबिक जमीन हडपण्याचं प्रकरण आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर सासऱ्याने जमीन हडप केली. हीच जमीन परत घेण्यावरून दोघांमध्ये बऱ्याच महिन्यांपासून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पुन्हा दोघांमध्ये जमिनीवरून वाद झाला. यादरम्यान सासऱ्याने त्याच्याकडे असलेल्या काठीने सूनेला मारहाण केली. 

Web Title: VIDEO : Fight between father in law and daughter in law in baghpat watch video