video: तासाभरात 1 हजाराची कमाई, कुंभमेळ्यात फोन चार्जिंगचा व्यवसाय, तरुण झाला मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:50 IST2025-02-11T19:49:50+5:302025-02-11T19:50:38+5:30
कुंभमेळ्यात पोटाची खळगी भरण्यासाठी देशभरातून आलेले अनेकजण विविध व्यवसाय करत आहेत.

video: तासाभरात 1 हजाराची कमाई, कुंभमेळ्यात फोन चार्जिंगचा व्यवसाय, तरुण झाला मालामाल
Mahakumbh Viral Video : प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात दररोज करोडो भाविक पवित्र गंगेत स्तान करण्यासाठी येत आहेत. भाविकांच्या आस्थेसह हा महाकुंभ अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही बनले आहे. या ठिकाणी देशभरातून अनेकजण येऊन छोटे-छोटे व्यवसाय करत आहेत. कुणी दात घासण्याचे ब्रश विकत आहे, कुणी माळा विकत आहे, कुणी खाण्या-पिण्याचे गाडी लावत आहे, तर कुणी इतर काही कामे करत आहे. येथील लोक विविध मार्गांनी कमाई करत आहेत. अशातच, सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
महाकुंभातील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणाने मोबाईल चार्जिंगचे दुकान सुरू केल्याचे दिस आहे. दावा केला जातोय की, हा तरुण एकाच वेळी 20-20 फोन चार्ज करुन अवघ्या तासाभरात 1000 रुपयांची कमाई करतोय.
व्हिडिओ व्हायरल
इन्स्टाग्रामवर @malaram_yadav_alampur01 या हँडलवरून महाकुंभतील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक तरुण महाकुंभात रस्त्यावर बसलेला दिसतोय. त्याच्या आजुबाजूला काही लोक आपापला मोबाईल फोन घेऊन चार्ज करताना दिसताहेत. दावा केला जातोय की, तो तासाला 20-25 मोबाइल फोन चार्ज करतो आणि प्रत्येक फोनसाठी एका तासाचे 50 रुपये घेतो. म्हणजेच, याद्वारे तो दर तासाला सूमारे 1000 रुपये कमवत आहे.