Video : लोक उभे असलेला सरकता जीना तुटला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:18 IST2018-10-24T14:12:40+5:302018-10-24T14:18:19+5:30
अनेकजण या सरकत्या जीनांवर होते, त्यामुळे तो तुटला.

Video : लोक उभे असलेला सरकता जीना तुटला आणि....
इटलीची राजधानी रोममध्ये एक एस्केलेटर म्हणजेच सरकता जीना तुटला आणि एकच गोंधळ उडाला. अनेकजण या सरकत्या जीनांवर होते, त्यामुळे तो तुटला. याचा घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ 'द गार्डियन'ने आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. रोमच्या सिटी सेंटर स्टेशनवर मंगळवारी रात्री नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. लोक फुटबॉलचा सामना बघण्यासाठी गेले होते. या घटनेत २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
या घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अॅक्सेलेटरची दशा पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, घटना कशी घडली असेल.