Video : अपंग कुत्र्याला व्हीलचेअर मिळाल्यावर असा काही धावला की, पाहून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:24 IST2019-12-27T13:22:44+5:302019-12-27T13:24:05+5:30

व्हीलचेअर मिळाल्यावर हा पीजन नावाचा कुत्रा आनंदाने बेभान होऊ धावत सुटला.

Video : Doggy got to run for the 1st time after car accident video goes viral | Video : अपंग कुत्र्याला व्हीलचेअर मिळाल्यावर असा काही धावला की, पाहून थक्क व्हाल!

Video : अपंग कुत्र्याला व्हीलचेअर मिळाल्यावर असा काही धावला की, पाहून थक्क व्हाल!

अशी कल्पना करा की, तुम्हाला कधीच चालता येत नव्हतं आणि एकाएकी तुम्हाला चालता येतं तेव्हा तुम्हाला किती आनंद होईल आणि तुम्ही काय कराल? अर्थातच आनंदाने तुम्ही सैरभैर पळू लागाल. असंच काहीसं पीजन नावाच्या कुत्र्यासोबत झालं. पिटबुल प्रजातीचा हा कुत्रा असून एका अपघातात त्याचे पाय गेले होते. त्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. त्याचे मागचे दोन्ही पाय काम करत नव्हते.

आता या पीजनचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. कारण तो आता पुन्हा चालू लागलाय, धावू लागलाय. नुकतीच पीजनला एक कस्टम मेड व्हीलचेअर देण्यात आली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत १८ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

लोकांना हा व्हिडीओ फारच पसंत पडलाय असून लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत आणि कौतुक करत आहेत.


Web Title: Video : Doggy got to run for the 1st time after car accident video goes viral