VIDEO: लग्नासाठी घोडी मिळाली नाही, चक्क गाढवावरुन काढली नवरदेवाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 18:22 IST2022-10-27T14:51:14+5:302022-10-27T18:22:12+5:30
नवरदेवाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIDEO: लग्नासाठी घोडी मिळाली नाही, चक्क गाढवावरुन काढली नवरदेवाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ...
Dulhe Ka Video: लग्नाशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हृदयाला भिडतात, तर काही खळखळून हसवतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील नवरदेवाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे, हा नवरदेव लग्नासाठी घोड्यावरुन जाण्याऐवजी चक्क गाढवावरुन जाताना दिसत आहे.
लग्नाच्या वरातीत नवरदेव नेहमी घोड्यावर दिसतो. घोड्यावर बसण्याचा नवरदेवांचा हट्ट असतो. पण, या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. नवरदेवाला घोडी न मिळाल्याने तो चक्क गाढवावर स्वार होऊन लग्नात पोहोचला. वराला गाढवावर स्वार होताना पाहून तिथे उपस्थित सर्वांना हसू आवरता आले नाही. व्हिडिओमध्ये एक महिला गाढवावर बसलेल्या नवरदेवावर पैसे ओवाळताना दिसत आहे. काही युजर्सचा दावा आहे की हा व्हिडिओ कोरोनाच्या काळातील आहे. मात्र, हे प्रकरण कुठले आहे, हे कळू शकलेले नाही.
या व्हिडिओमध्ये गाढवासमोर वरातीमध्ये आलेले लोक नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'फुंटाप' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'घोडी नाही तर गाढव.' मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ यूजर्सना चांगलाच आवडला असून, यावर अनेकजण विविध कमेंट करत आहेत.