VIDEO : मेट्रो स्टेशनच्या वेंडिंग मशीनमध्ये चिप्स - कोल्ड्रिंगच्या जागी अंडरविअर, महिलेने केला अजब व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:46 IST2026-02-04T14:45:50+5:302026-02-04T14:46:40+5:30
Underwear Vending Machine: दिल्ली मेट्रोच्या रोहिणी ईस्ट भागातील एक वेंडिंग मशीन वेगळ्याच कारणाने चर्चेचं कारण ठरली आहे. कारण या वेंडिंग मशीनमध्ये अंडरविअरचे पॅकेट ठेवलेले होते.

VIDEO : मेट्रो स्टेशनच्या वेंडिंग मशीनमध्ये चिप्स - कोल्ड्रिंगच्या जागी अंडरविअर, महिलेने केला अजब व्हिडीओ
Underwear Vending Machine: वेगवेगळे मॉल्स, थिएटर किंवा स्टेशनवर वेंडिंग मशीन लावलेल्या असतात. सामान्यपणे या वेंडिंग मशीनमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवल्या जातात. बिस्किटं, ज्यूस, चिप्स, बर्गर, चॉकलेट इत्यादी इत्यादी वस्तू ठेवल्या जातात. पण दिल्ली मेट्रोच्या रोहिणी ईस्ट भागातील एक वेंडिंग मशीन वेगळ्याच कारणाने चर्चेचं कारण ठरली आहे. कारण या वेंडिंग मशीनमध्ये अंडरविअरचे पॅकेट ठेवलेले होते. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की, तीन वेंडिंगमधील बाजूला ठेवलेल्या आहेत. यांव वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचं डिझाइन बनवलेलं आहे. तर बाजूला डिजिटल स्क्रीन आहे. आत रकान्यांमध्ये वेगवेगळ्या साइजच्या अंडरविअरचे पॅकेट्स ठेवलेले आहेत. मेट्रो स्टेशनच्या लख्ख प्रकाशात या मशीन डोळ्यांना आणखीनच खटकतात.
व्हिडीओ काढणारी महिला हा नजारा बघून हैराण झाली. ती म्हणाली की, तिने मेट्रो स्टेशनमध्ये याआधी असं काही पाहिलं नाही. अंडरविअर वेंडिंग मशीनमध्ये विकले जात आहेत आणि हे काहीतरी वेगळ्या लेव्हलचं इनोव्हेशन आहे. ती गंमतीने विचारते की, कोण मेट्रोमध्ये हा विचार करून येईल की, ते अंडरविअर विसरले आणि आता इथूनच खरेदी करायची. अर्थातच हे अनेकांसाठी आश्चर्य असेल, पण काही लोकांसाठी फायदेशीरही ठरू शकतं.
१ फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत ७५ हजारांपेक्षा जास्त हा व्हिडीओ बघण्यात आलाय. अनेकांनी ही वेंडिंग मशीन महिलांसाठी उपयोगी असल्याच्या कमेंट केल्या. खासकरून मासिक पाळी किंवा अचानक डाग लागण्याच्या स्थितीत. तर काहींचं मत पडलं की, वेंडिंग मशीन केवळ चिप्ससाठी नसतात, तर त्यात गरजेच्या वस्तू देखील असू शकतात. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक या व्हिडिओवर देत आहेत.