आरारारा खतरनाक! उभ्या डोंगराहून सायकलने खाली येत होता, बघा थरारक व्हिडीओत पुढे काय होतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:27 IST2022-04-06T13:13:52+5:302022-04-06T13:27:52+5:30
Cycle stunt viral Video : हा हैराण करणारा व्हिडीओ बघून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओत एक व्यक्ती उभ्या डोंगराहून सायकल चालवत खाली येतो.

आरारारा खतरनाक! उभ्या डोंगराहून सायकलने खाली येत होता, बघा थरारक व्हिडीओत पुढे काय होतं!
Cycle stunt viral Video : तुम्ही सोशल मीडियावर मनात धडकी भरवणारे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत जो बघून तुमचा घसा कोरडा पडेल. यात एक व्यक्ती डोंगरावर सायकलसोबत स्टंट करताना दिसत आहे. हा हैराण करणारा व्हिडीओ बघून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओत एक व्यक्ती उभ्या डोंगराहून सायकल चालवत खाली येतो.
हा व्हिडीओ इतका थरारक आहे की, बघण्यासाठीही मोठं काळीज हवं. कारण व्हिडीओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना धक्का बसत आहे. हा खतरनाक व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतं की, जरा जरी चूक झाली असती तर त्या व्यक्तीचा जीवही गेला असता. पण सुदैवाने तसं काही होत नाही.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक उंच डोंगर दिसत आहे. डोंगराच्या वरच्या टोकाच्या काठावर एक व्यक्ती सायकलवर आहे. तो डोंगराहून सायकलने खाली येत आहे. सुरूवातीला तर असं वाटतं की, ही व्यक्ती सायकलसोबत डोंगराहून खाली पडणार. मात्र, असं काही होत नाही आणि तो सहजपणे सायकलसोबत डोंगराखाली येतो.
हा व्हिडीओ earthfocus नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ किलियन ब्रो उटाहच्या मोआबमध्ये शूट करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि त्या व्यक्तीचं कौतुक करत आहेत.