Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:08 IST2026-04-05T17:05:26+5:302026-04-05T17:08:51+5:30
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक महिला तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. लोक सेलिब्रेशन करत आहेत. हे सेलिब्रेशन आहे घटस्फोटानंतरच.

Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
घटस्फोट झाल्यानंतर कोणी मुलीचं स्वागत ढोल ताशा लावून जल्लोषात करताना तुम्ही बघितलंय का? मूळात घटस्फोट ही गोष्ट आपल्याकडे चिंता वाढवणारी म्हणूनच बघितली जाते, पण एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी ढोल-ताशाच्या गजरात तिचे स्वागत केले. इतकेच नाही, तर लोकांना लाडूही वाटले.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली आहे. घटस्फोटानंतर वडिलांनी मुलीचे फुलाचा हार घालत स्वागत केले. कुटुंबातील लोकांनी ढोल-ताशाच्या गजरावर ठेका धरला. वडील मुलीला घेऊन आले.
व्हायरल व्हिडीओतील पूर्ण प्रकरण
मेरठमधील शास्त्रीनगर परिसरात राहणारे निवृत्त न्यायाधीश डॉ. ज्ञानेंद्र शर्मा यांची मुलगी प्रणिताचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. प्रणिताचे लग्न शाहजहापूरमधील गौरव अग्निहोत्री याच्यासोबत झाला होता.
मेरठ: तलाक के बाद बेटी को ढोल-नगाड़ों के साथ घर लाए रिटायर्ड जज#Meerutpic.twitter.com/LpPhkU8aSg
— NDTV India (@ndtvindia) April 5, 2026
गौरव लष्करात मेजर या पदावर असून, जालंधरमध्ये ड्युटीवर आहेत. प्रणिताला एक मुलगाही आहे. पण, सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ होत असल्याने वाद वाढत गेला. सासरच्या छळाचे प्रकरण इतके वाढले की, घटस्फोटापर्यंत गेले.
प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने प्रणिता आणि गौरव यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. घटस्फोटाचा निकाल आल्यानंतर डॉ. ज्ञानेंद्र शर्मा हे कुटुंबीयांसह गेले आणि मुलीला वाजत गाजत घरी घेऊन आले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.