Video: हाण की बडीव! रेस्टॉरंटमध्ये प्रियकरासोबत रंगेहात सापडली, आईने दोघांनाही बदडून काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:37 IST2023-02-17T15:17:35+5:302023-02-17T15:37:25+5:30
फेब्रुवारी महिन्यातील पहिलाच आठवडा व्हॅलेंटाईन डे आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात अनेकजण आपल्या प्रेयसीला भावना मनातील भावना व्यक्त करतात.

Video: हाण की बडीव! रेस्टॉरंटमध्ये प्रियकरासोबत रंगेहात सापडली, आईने दोघांनाही बदडून काढलं
फेब्रुवारी महिन्यातील पहिलाच आठवडा व्हॅलेंटाईन डे आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात अनेकजण आपल्या प्रेयसीला भावना मनातील भावना व्यक्त करतात. एकमेकांना गिफ्ट देत असतात. अनेक ठिकाणी व्हॅलेंटाईनला विरोधही केला जातो. काही ठिकाणी यावरुन वादावादीही होत असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ तरुणीच्या पालकांनी मारहाण केल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण आणि तरुणी एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसत आहे. यानंतर काही वेळाने त्या तरुणीची आई त्या ठिकाणी आल्याचे दिसत आहे, आणि तरुणीसह तरुणाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
जिममध्ये सुंदर मॉडलला एकटी पाहून छेडछाड करू लागला होता तरूण, पुढे जे झालं ते बघून व्हाल अवाक्...
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पोस्टला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यात अनेकांनी 'देसी व्हॅलेंटाईन' असंही म्हटले आहे. आता पार्यंत हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.
Kalesh B/w Couples and Girl’s Mom on Valentine’s Daypic.twitter.com/01Oia07RRt
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 15, 2023
व्हॅलेंटाईन दरम्यान असे अनेक व्हिडीओ समोर आले होते. काही दिवसापूर्वी गार्डमध्ये बसलेल्या दांम्पत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.