Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 20:01 IST2020-11-04T19:59:50+5:302020-11-04T20:01:09+5:30
Viral Video in Marathi : या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करत आहे. हा स्टंट पाहून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल

Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप
सोशल मीडियावर अलिकडे एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लक्षवेधी असून इंटरनेटवर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करत आहे. हा स्टंट पाहून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल. या व्हिडीओत बॅकफ्लिप (Boy Doing Backflip) करताना हा चिमुरडा दिसून येईल. सोशल मीडिया युजर्सनी या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
या भन्नाट व्हिडीओला इंस्टाग्राम युजर आरिफने शेअर केलं आहे. हा स्टंट खुद्द आरिफने केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चालत्या ट्रेनमध्ये हा मुलगा लाल रंगाच्या टी- शर्टमध्ये दिसून येत आहे. कॅमेराकडे पाहत हा स्टंट करायला त्याने सुरूवात केली आहे. स्लो मोशनमध्ये हा व्हिडीओ दाखवला जात आहे. याला म्हणतात मेहनत! सायकलस्वाराने शेअर केला पायांचा फोटो अन् नेटिझन्स म्हणाले....
हा व्हिडीओ १ नोव्हेंबरला इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून खूप व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या मुलाच्या स्टंटचे कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून चालत्या लोकलमधील हे दृश्य असल्याचे दिसून येत आहे.
शाब्बास! नागपूरच्या २४ वर्षीय पोरानं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'अशी' 2 इन 1 बॅग