Video: शंकर महादेवन यांच्या 'ब्रेथलेस' गाण्यावर मुलाने वाजवली मंत्रमुग्ध करणारी बासरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:43 IST2026-02-25T17:42:59+5:302026-02-25T17:43:51+5:30

Breathless Song Flute playing video: प्रत्येक संगीतप्रेमी रसिकाने एकदा तरी पाहायलाच हवा हा व्हिडीओ...

Video Boy plays mesmerizing flute on Shankar Mahadevan Breathless song social media trending | Video: शंकर महादेवन यांच्या 'ब्रेथलेस' गाण्यावर मुलाने वाजवली मंत्रमुग्ध करणारी बासरी

Video: शंकर महादेवन यांच्या 'ब्रेथलेस' गाण्यावर मुलाने वाजवली मंत्रमुग्ध करणारी बासरी

Breathless Song Flute playing video: संगीत क्षेत्रात कलाकाराचा सराव आणि समर्पण किती महत्त्वाचे असते, याचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी एकाच श्वासात गायलेले 'ब्रेथलेस' गाणे गाणेच कायमच मोठे आव्हान मानले जाते. पण एका मुलाने तर कमालच केली. बासरी हा श्वासाचा खेळ असं म्हटलं जाते. या मुलाने ब्रेथलेस गाणे आपल्या बासरीवर वाजवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

संगीतप्रेमींना आश्चर्याचा सुखद धक्का

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा स्टेजवर बसून बासरी वाजवताना दिसत आहे. 'ब्रेथलेस' गाण्याची धून अत्यंत वेगवान असते, मात्र या मुलाने आपल्या बोटांच्या हालचाली आणि श्वासावरचे नियंत्रण इतके अचूक ठेवले आहे की धून कुठेही तुटताना दिसत नाही. बासरी हे वाद्य श्वासावर आणि फुंकरीवर चालणारे वाद्य आहे. त्यामुळे इतक्या वेगाने आणि सलग एखादी धून वाजवणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. या युवा कलाकाराने ज्या सहजतेने हे सादरीकरण केले आहे, त्याचे संगीत प्रेमींकडून भरभरून कौतुक होत आहे. इंटरनेटच्या जगात निखळ प्रतिभा (Pure Talent) म्हणून हा व्हिडिओ सध्या सर्वत्र शेअर केला जात असून, या मुलाच्या प्रतिभेने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.


हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'ghisingsusma1998' नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच सुमारे २ लाख ८५ हजार लोकांनी याला लाईक केले आहे. एका युजरने कमेंट केली की, हे गाणे गाण्यापेक्षा बासरीवर वाजवणे अधिक कठीण आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, मी डोळे मिटून हे संगीत ऐकत होतो आणि मला जाणवले की काही ठिकाणी माझाच श्वास रोखला गेला, इतकी या धूनची ताकद आहे.

Web Title : शंकर महादेवन के 'ब्रेथलेस' गाने पर लड़के की बांसुरी ने श्रोताओं को मंत्रमुग्ध किया।

Web Summary : एक वायरल वीडियो में एक लड़का शंकर महादेवन के 'ब्रेथलेस' गाने को बांसुरी पर बजा रहा है। उसकी उंगलियों की सटीक हरकत और सांस नियंत्रण ने संगीत प्रेमियों को हैरान कर दिया है, जिससे उसे प्रतिभा के लिए प्रशंसा मिली है। वीडियो को लाखों व्यूज और लाइक्स मिले हैं।

Web Title : Boy's flute rendition of Shankar Mahadevan's 'Breathless' stuns listeners.

Web Summary : A viral video showcases a young boy's exceptional flute performance of Shankar Mahadevan's 'Breathless.' His precise finger movements and breath control have amazed music lovers, earning him praise for his talent. The video has garnered millions of views and likes.