VIDEO : कोल्ड ड्रिंकचा एक घोट पिताच माकडाला बसला झटका, एक्सप्रेशन पाहून पोट धरून हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 13:09 IST2021-11-26T13:08:10+5:302021-11-26T13:09:28+5:30
Social Viral : व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, यात एक माकड घराच्या रोलिंगवर बसलं आहे. त्याच्या हातात कोल्ड ड्रिंकची एक बॉटल आहे. त्यात थोडं कोल्ड ड्रिंक आहे.

VIDEO : कोल्ड ड्रिंकचा एक घोट पिताच माकडाला बसला झटका, एक्सप्रेशन पाहून पोट धरून हसाल
Social Viral : कोल्ड ड्रिंक अनेक प्रकारचे असतात. पण ब्लॅक कलरचं कोल्ड ड्रिंग पिऊन डोक्याला झिणझिण्या येतात. अनेकदा ब्लॅक कलरचं कोल्ड ड्रिंक पिऊन झटका मेंदूला झटका बसतो. अशात जर माकडाने ब्लॅक कलरचं कोल्ड ड्रिंक प्यायलं, तर काय हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून माकडाचे एक्सप्रेशन पाहून लोक पोट धरून हसत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक माकड ब्लॅक कलरचं कोल्ड ड्रिंक पिताना दिसत आहे. यानंतर जे होत ते बघून तुम्ही पोट धरून हसाल. तुम्ही बघितलं असेल की, माकडांच्या हाती काहीही लागलं तरी ते घेऊन पळून जातात. अनेकदा ते लोकांच्या हातातील वस्तूही घेऊन पळून जातात.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, यात एक माकड घराच्या रोलिंगवर बसलं आहे. त्याच्या हातात कोल्ड ड्रिंकची एक बॉटल आहे. त्यात थोडं कोल्ड ड्रिंक आहे. त्यातील एक घोट कोल्ड ड्रिंक माकड पितो.
माकड जसा कोल्ड ड्रिंकचा एक घोट घेतो. तसा त्याला एक जोरदार झटका बसतो. त्यानंतर तो कोल्ड ड्रिंकची बॉटल लगेच खाली फेकतो. या व्हिडीओतील माकडाचे एक्सप्रेशन पाहूनच आपल्याला हसू येतं.
या व्हिडीओला आतापर्यंत ५८ मिलियन लोकांनी पाहिलं आहे. तर २.५ मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, ''बवाल चीज है कोल्ड ड्रिंक, सारा सिस्टम हिल जाता है.'