Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:33 IST2025-08-28T13:30:35+5:302025-08-28T13:33:14+5:30
Youth died by heart attack viral video: छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत तरुण महादेव बनला होता. जल्लोष सुरू असतानाच तरुण अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
Viral Video News: शोभायात्रा सुरू होती. डीजेवर गाणी वाजत होती. वेगवेगळ्या देवांच्या वेशभूषा केलेले काही तरुण डीजेच्या समोरचं होते. तरुणी नाचत होत्या. अशातच महादेवाची भूमिका करणारा तरुण खाली बसला आणि कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तमकुहीराजमध्ये यात्रा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यात्रा सुरू असताना शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत महादेवाची भूमिका करणाऱ्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तरुण खाली पडल्यानंतर गोंधळ उडाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रामबहल असे मयत तरुणाचे नाव आहे. तो शोभायात्रेत महादेवाची वेशभूषा करून सहभागी झाला होता. मयत तरूण बेलवा गावाचा आहे. डीजेचा प्रचंड आवाज सुरू होता. सगळे कलाकार वेगवेगळ्या देवांच्या भूमिकेत होते आणि नाचत होते.
- ये सिलसिला नहीं थमने वाला! अब 'भगवान शंकर' भी इसकी चपेट में आ गए...
— Vaibhava Pandey (@VaibhavaPandey) August 28, 2025
-----
- कुशीनगर में डोल मेले की झांकी निकल रही थी। डीजे की धुन पर कलाकार झूम रहे थे। अचानक भगवान शंकर बना युवक स्टेज पर गिरा और मौत हो गई। पता चला साइलेंट हार्ट अटैक आया था। #silentheartattack… pic.twitter.com/wRVOkbLZt7
रामबहलही नाचत होता. नंतर तो खाली बसला आणि त्यानंतर खाली कोसळला. तो खाली पडल्यानंतर लगेच गाणी बंद करण्यात आली. रामबहल खाली पडताच गर्दीत गोंधळ उडाला आणि लोक इकडे-तिकडे पळू लागले. काहींनी रामबहलला उचलले आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तोपर्यंत त्याचा मृत्य झाला होता. प्राथमिक माहितीनुसार त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला आहे.