Video: धक्कादायक! धबधब्याखाली उभे असलेल्या पर्यटकांवर अचानक पडला एक टन बर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:15 IST2025-01-07T16:15:00+5:302025-01-07T16:15:53+5:30

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: A ton of snow suddenly fell on tourists standing under a waterfall | Video: धक्कादायक! धबधब्याखाली उभे असलेल्या पर्यटकांवर अचानक पडला एक टन बर्फ

Video: धक्कादायक! धबधब्याखाली उभे असलेल्या पर्यटकांवर अचानक पडला एक टन बर्फ

Viral Video : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ मनोरंजक असतात, तर काही थरकाप उडवणारे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनेक पर्यटक एका गोठलेल्या धबधब्याखाली उभे राहून फोटो काढताना दिसतात. यावेळी अशी घटना घडते, जी पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 5 जानेवारी रोजी चीनच्या शिआन येथे घडली. येथील गोठलेल्या हेशांचा धबधब्याखाली काही पर्यटक मजामस्ती करत होते, फोटो काढत होते. यावेळी अचानक उंचावरुन सूमारे एक टन वजनाचा बर्फ पर्यटकांच्या अंगावर पडतो. बर्फ पडताच आरडाओरडा सुरू होतो अन् जीव वाचवण्यासाठी पर्यटक धबधब्यापासून दूर धावू लागतात. या घटनेत एक जण जखमी झाला. या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना या भागात येण्यास बंदी घातली आहे.


इंस्टाग्रामवर @livingchina नावाच्या पेजवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशा प्रकारचा बर्फाळ धबधबा खूप धोकादायक असतो. अशा ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवावे, असे कॅप्शन व्हिडिओसोबत लावले आहे. दरम्यान, 2019 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेत उंचावरुन बर्फ पडल्याने नऊ जण जखमी झाले होते. 

Web Title: Video: A ton of snow suddenly fell on tourists standing under a waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.