कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांबरोबर पोलिसांनी जे केलं ते पाहून मालकांचे डोळे उघडेच राहिले, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 16:53 IST2021-02-11T16:44:13+5:302021-02-11T16:53:27+5:30
Trending Viral News in Marathi : या व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी कर्कश आवाजाच्या सायलेंर्सवर रोड रोलर चालवताना दिसून येत आहे.

कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांबरोबर पोलिसांनी जे केलं ते पाहून मालकांचे डोळे उघडेच राहिले, पाहा व्हिडीओ
काही दिवसांपासून बँगलुरू पोलिसांनी जास्त आवाज करत असलेल्या एग्जॉस्ट साइलेंसर (silencers) विरुद्ध एक मोहिम हाती घेतली होती. खासकरून रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) मधल्या सायलेंसरबाबत पोलिस अधिकच आक्रमक झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोलिसांचे कौतुक करत आहेत.
आयएफएस अधिकारी प्रवीण अंगूसामी (IFS Officer Praveen Angusamy) यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एक पोलिस अधिकारी कर्कश आवाजाच्या सायलेंर्सवर रोड रोलर चालवताना दिसून येत आहे.
The Udupi district police, Karnataka, seized about 110 modified noisy silencers on two wheelers in a month-long drive & destroyed them using a road roller at the Manipal police station premises. #InstantJustice#Sharedpic.twitter.com/4G7foLYpsK
— Praveen Angusamy, IFS 🐾 (@PraveenIFShere) February 10, 2021
व्हिडीओ शेअर करताना आयएफएस अधिकारी प्रवीण अंगूसामी यांनी लिहिले आहे की, कर्नाटकातील उड्डप्पी जिल्ह्यातील पोलिसांनी महिन्या भरातील ड्राईव्हदरम्यान दुचाकी वाहानातील जवळपास ११० आवाज करणारी वाहानं जप्त केली आहेत. मणिपाल पोलिस स्टेशन परिसरात एका रोड रोलरचा उपयोग केल्यानंतर त्या सायलेंर्सला नष्ट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले....
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर काही लोक पोलिसांच्या या कामामुळे नाराज झाले आहेत. काही काळापासून पोलिस रॉयल एनफील्डच्या वाहनचालकांना मोठ्या आवाजात साइलेन्सर बसविण्यापासून रोखत होते. ते रस्त्यावरून काढले जात होतेस तरिही हा प्रकार बंद न झाल्यामुळे आता या वाहन चालकांना केवळ दंड आकारला गेला नाही तर काही दुचाकी जप्त केल्या आहेत. मानलं गड्या! नोकरी सोडली अन् युट्यूबची आयडीया घेऊन शेती केली, आता घेतोय लाखोंची कमाई